Join us
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : अनू मलिकाला डबल दणका... आणखीन दोन महिलांनी केले 'हे' आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 16:21 IST

बॉलिवूडमध्ये आलेले 'मी टू'चे वादळ काही केल्या शमायचे नाव घेत नाही आहे. #मी टू' मोहिमे अंतर्गत रोज एक नवा खुलासा होताना दिसतो आहे.

बॉलिवूडमध्ये आलेले 'मी टू'चे वादळ काही केल्या शमायचे नाव घेत नाही आहे. #मी टू' मोहिमे अंतर्गत रोज एक नवा खुलासा होताना दिसतो आहे. गायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडितनंतर आणखीन दोन महिलांनी संगीतकार- गायक अनू मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. मिड डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये या महिलांनी सांगितले. 90 च्या दशकात मेहबूब स्टुडिओमध्ये एका गाण्याचे शूटिंग सुरु होते. ज्यावेळी या महिला त्यांना भेटायला गेल्या होत्या त्यावेळी अनु मलिक यांनी त्यांना चुकिच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. त्यासाठी अनू मलिक यांनी त्यांची माफी सुद्धा मागितली होती. यानंतर एकदा यापैकी एका महिलेला त्यांने काही कामानिमित्त घरी बोलावले. आधी काही काळ औपचारिक गप्पा मारल्या आणि त्यानंतर त्यांनी माझा स्कर्टवर केला. त्यांना ढकलून मी दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. तेवढ्यात कोणीतरी दार वाजवलं पण या प्रसंगाबाबत कोणाला काहीच न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली होती. नंतर मला घरी सोडताना त्यांनी पुन्हा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला,’ असं त्या महिलेचा आरोप आहे. तर दुसरा आरोप करणारी महिला इंडियन आयडलच्या काही वर्षांपूर्वीच्या भागाची स्पर्धक आहे. 

श्वेता पंडितने, शान आणि सुनिधीसोबत गाण्याची संधी देईन मी तुला देईन त्याबदल्यात तू मला किस दे  अजब मागणी केल्याचा आरोप अनु मलिकवर लावला आहे. श्वेता आणि सोनाचे आरोप याआधीच अनु मलिक यांनी हे सर्व आरोप आधीच फेटाळून लावले आहेत. 

‘मी टू’च्या वादळात आतापर्यंत नाना पाटेकर, आलोक नाथ, दिग्दर्शक विकास बहल, रजत कपूर, साजिद खान, कैलाश खेर यांच्यावर  लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. यानंतर या वादळा अंतर्गत बॉलिवूडमधील आणखीन किती नावं समोर येतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :अनु मलिक