Join us

'हा' मराठमोळा रॅपर 'मी पण सचिन'मधून सुरु करतोय नवी इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 14:19 IST

'मी पण सचिन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला आहे. स्वप्नील जोशींची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

ठळक मुद्देरॅपर श्रेयश जाधव या सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे 'मी पण सचिन' चित्रपट श्रेयश जाधव यांच्या लेखणीतून तयार झाला आहे.

'मी पण सचिन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला आहे. स्वप्नील जोशींची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. एका ध्येयाने झपाटलेल्या महत्वाकांक्षी तरुणाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. असा हा 'मी पण सचिन' चित्रपट श्रेयश जाधव यांच्या लेखणीतून तयार झाला आहे. रॅपर, निर्माता, पटकथाकार अशा विविधांगी भूमिका सक्षम पद्धतीने पार पडल्यानंतर श्रेयश या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. "दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शीप" असतो. त्याला सर्वच विभागांवर लक्ष ठेवावे लागते. आणि दिग्दर्शकाच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर फिल्म तयार होते. दिग्दर्शनासाठी तुम्हाला १००० टक्के कष्ट द्यावे लागतात, एकाग्रता लागते, स्वतःला विसरून काम करावे लागते. त्यामुळे हा प्रवास तसा सोपा नव्हता पण हा अनुभव खूप चांगला होता. यातून मी अनेक गोष्टी शिकलो. आणि मी या सर्व गोष्टींना पुरून उरलो. कारण  माझे काम ही माझी पॅशन आहे, आणि मी त्यासाठी सर्व प्रकारची मेहनत करण्याची  तयारी ठेवली होती. यात मला माझ्या कलाकारांची देखील चांगली साथ मिळाली. भविष्यातही मी सिनेमे दिग्दर्शित करेलच. या चित्रपटात मी दिग्दर्शनासोबत लिखाणाची जबाबदारी सुद्धा निभावली आहे. मनात एक विश्वास आहे की हा चित्रपट यशस्वी होणारच." असे मत 'मी पण सचिन' सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक श्रेयश जाधव यांनी व्यक्त केले.

 'मी पण सचिन' हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ह्या चित्रपटातून रसिकांना अविनाश नारकर, सुहिता थत्ते, कल्याणी मुळे, अभिजीत खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले या आणि अशा अनेक बड्या कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

 या चित्रपटाची निर्मिती इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची आहे. तर नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे  या चित्रपटाचे निर्माता आहे.  यासोबतच इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.

टॅग्स :श्रेयश जाधवअभिजीत खांडकेकरप्रियदर्शन जाधवस्वप्निल जोशी