Join us

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 13:32 IST

Mazya Navryachi Bayako : होय, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता तुम्हाला हिंदीतही बघता येणार आहे.

माझ्या नवऱ्याची बायको’  (Mazya Navryachi Bayako) या मालिकेनं प्रेक्षकांना नुसतं वेड लावलं होतं. झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेनं टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. नटव्या शनायाच्या नखऱ्यांना भुललेला गुरूनाथ आणि त्याला वठणीवर आणणारी त्याची खमकी बायको राधिका अशी ही भन्नाट कथा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती. आता ही मालिका अचानक आठवण्याचं कारण काय तर या मालिकेबद्दलची नवी अपडेट. होय, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता तुम्हाला हिंदीतही बघता येणार आहे. हिंदीमध्ये डब करून ही मालिका हिंदी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.

 23 ऑगस्ट 2016 रोजी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता आणि बघता बघता ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. मालिकेतील राधिका, शनाया, गुरूनाथ ही पात्रही तेवढीच लोकप्रिय झाली होती. आज इतक्या वर्षानंतरही ही मालिका आणि यातील कलाकारांना प्रेक्षक विसरलेले नाहीत.  गेल्यावर्षी ही मालिका बंद झाली होती. पण आता ही मालिका  हिंदीमध्ये बघता येणार आहे. झी अनमोल या वाहिनीवर ही मालिका ‘मेरे साजन कि सहेली’ या नावानं पाहायला मिळणार आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत अभिनेत्री अनिता दातेनं राधिकाची साकारली होती. तर तिच्या नवऱ्याची म्हणजेच गुरूनाथची भूमिका अभिनेता अभिजित खांडकेकरनं जिवंत केली होती. शनायाची भूमिका सुरूवातीला रशिका सुनील साकारली होती. नंतर या भूमिकेत इशा केसरकर दिसली होती. याशिवाय अरुण नलवडे,मिहीर राजदा, अदिती द्रविड, श्वेता मेहेंदळे, यश प्रधान, सचिन देशपांडे,रुचिरा जाधव यांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोझी मराठीअनिता दातेअभिजीत खांडकेकर