Join us

यश होणार परीची आई; नेहाच्या गैरहजेरीत घेणार पोटच्या पोरीप्रमाणे काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:49 IST

Mazi tuzi reshimgath: नेहा आजोबांची काळजी घेण्यासाठी पॅलेसवर राहात आहे. तर, दुसरीकडे यश परीची काळजी घेण्यासाठी चाळीत राहात आहे.

छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. काही दिवसांपूर्वी आजारी पडलेल्या आजोबांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र, यश आणि नेहा यांच्या लग्नाचं सत्य अजूनही आजोबांना ठावूक नाही. त्यामुळे ते नेहाला त्यांची सून समजत असून रोज तिला घरात रहून घरचा कारभार सांभाळावा असं सांगतात. त्यामुळे नेहादेखील आजोबांच्या आरोग्यासाठी पॅलेसमध्ये राहात आहे. मात्र, त्यामुळे परीला घरी एकटच राहावं लागत आहे. विशेष म्हणजे नेहाची ही उणीव यश भरून काढत आहे.

सध्या सोशल मीडियावर 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यात नेहा आजोबांची काळजी घेण्यासाठी पॅलेसवर राहात आहे. तर, दुसरीकडे यश परीची काळजी घेण्यासाठी चाळीत राहात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नेहा एकीकडे आजोबांची काळजी घेत आहे. मात्र, तिचं सगळं लक्ष परीकडे आणि घराकडे लागलं आहे. आईपासून दूर असलेली परी कशी रहात असेल ही एकच काळजी तिला सतावत आहे.मात्र, नेहाच्या गैरहजेरीत यश, परीची उत्तमरित्या काळजी घेत आहे. 

दरम्यान, ज्याप्रमाणे नेहा परीला इंजक्शन देते त्याच पद्धतीने यश तिला इंजक्शन देतो. जे पाहून यश अगदी आईप्रमाणे परीची काळजी घेत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सध्या या मालिकेत यश आणि नेहा एकमेकांची जबाबदारी लिलया पार पाडत असल्याचं दिसून येत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीश्रेयस तळपदे