Join us

"त्या आजीबाईंनी पाठीवर मारलं अन् मग...", 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्रीला आला चाहतीचा 'असा' अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:23 IST

"आजीबाईंनी माझ्या पाठीवर जोरात मारलं आणि...", 'लक्ष्मी निवास' फेम मंगलाने सांगितला अनोखा किस्सा

Swati Deval : छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा दिवसेंदिवस वाढत चालला. या मालिकांप्रमाणेच त्यातील कलाकार देखील आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण करतात. त्यामुळे अनेकदा चाहते कलाकारांना ते टीव्हीवर साकारत असलेल्या व्यक्तिरेखेवरुन ओळखतात. परंतु, कलाकारांना जेव्हा त्यांचे चाहते कामाबद्दल प्रतिक्रिया देतात तेव्हा ते देखील भारावून जातात. अशाच एका चाहतीने केलेल्या अनपेक्षित गोष्टीमुळे अभिनेत्री स्वाती देवल (Swati Deval) भारावून गेली होती. याचा किस्सा तिने एका मुलाखतीत शेअर केला आहे. 

नुकतीच अभिनेत्री स्वाती देवलने 'तारांगण'ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने सांगितलं की,"  अलिकडेच एक घटना घडली होती की, एका आजींबाईंनी जोरात माझ्या पाठीवर मारलं आणि मला अनिता नावाने हाक मारली. पहिल्यांदा त्यांनी मला अनिता नावाने का मारली हेच कळत नव्हतं. याचं कारण म्हणजे मी २००७ साली कळत न कळत नावाची मालिका करत होते, त्या मालिकेत माझं नाव अनिता अभ्यंकर होतं. तेव्हा मला पाहिल्यांनतर त्या आजींनी ती मालिका आठवली. त्यावेळी आजीबाई मला म्हणाल्या, 'तू आता मंगल करते आहेस, त्याआधी तू मिनाक्षी वहिनी केलीस. शिवाय कांता देखील साकारली.' येवढ्या वेगवेगळ्या भूमिका साकारतेस, हे करताना तुला आनंद मिळतो का? तू हे सगळं कसं करते? असे प्रश्न लोक मला अनेकदा विचारतात."

मग पुढे अभिनेत्री म्हणाली, "या गोष्टींचा मला खूप आनंद वाटतो, कारण, लोकांना मी वेगळी जाणवते आणि मी स्वाती न राहता ज्या भूमिका साकारते ते पात्र त्यांना त्यांच्या घरातील आहे असं वाटतं. म्हणून ते बिनधास्तपणे येऊन माझ्याशी बोलतात. याचं मला फार कौतुक वाटतं." असा किस्सा अभिनेत्रीने शेअर केला. 

वर्कफ्रंट

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून स्वाती देवल घराघरात पोहोचली. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' मालिकेत मंगलच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी