Marathi Actor Amit Parab: मराठी कलाविश्वात काम करणारे कलाकार अनेकदा मानधन वेळेत मिळत नसल्याची तक्रार करताना दिसतात. अलिकडच्या दिवसांमध्ये बऱ्याच कलाकारांनी या प्रकरणी आवाज उठवला तसचं कामाचा मोबदला योग्य वेळी मिळत नाही, असे आरोप अनेकांकडून करण्यात आले आहेत. अशातच टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याने त्याची व्यथा मांडली आहे. हा अभिनेता अमित परब (Amit Parab).
नुकताच अमित परबरने 'लोकमत फिल्मी'सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, अभिनेत्याला हल्ली कलाकारांच मानधन थकवलं जातं असे प्रकार समोर येत आहेत. तुला कधी असा अनुभव आलाय का याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी बोलताना अभिनेता म्हणाला, "हो, दुर्दैवाने मला असा अनुभव आला आहे. नकळत सारे घडले नंतर मी एका मालिकेसाठी काम केलं होतं. तिकडे मी माझं मानधन मागून मागून थकलो तरी त्यांनी ते दिलं नाही. त्यामध्ये माझं तीन दिवसांचं काम होतं. आपण एखाद्या ठिकाणी काम केलं तर त्यांचा मोबदला मागणं हे आपलं काम आहे. शेवटी मानधन देतो म्हणून सांगितलं पण ते त्यांनी आतापर्यंत दिलं नाही. एखादा कलाकार काम करतोय, त्याचा वेळ जर तुम्हाला देतोय तर अपेक्षा हीच असते की त्याला त्याच्या मोबदला योग्य वेळी मिळावा. पण, हे फार चुकीचं आहे. " असा खुलासा अभिनेत्याने केला.
वर्कफ्रंट
अभिनेता अमित परबच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने मन उडू उडू झालं','डॉक्टर डॉन', 'नकळत सारे घडले', 'रंग माझा वेगळा' या मालिकांमध्ये तो झळकला. लवकरच हा अभिनेता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.