Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सासू सासरे येती घरा...' हेमंत ढोमेची पोस्ट व्हायरल, क्षितीच्या आईवडिलांचं केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 16:21 IST

क्षिती जोगचे वडील अनंत जोग हे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. तर आई उज्वला जोगही बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे.

हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि क्षिती जोग (Kshiti Jog) ही सुपरहिट मराठमोळी जोडी आहे. 'झिम्मा' आणि 'झिम्मा 2' च्या यशानंतर त्यांचा चाहतावर्ग वाढला आहे. खऱ्या आयुष्यातही हे कपल खूपच एंटरटेनिंग आहे. मराठी प्रेक्षकांची तर ही एकदमच लाडकी जोडी बनली आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टही कायम व्हायरल होत असतात. क्षिती जोगचे आईवडील दिग्गज कलाकार आहेत. हेमंत ढोमेने सासू सासऱ्यांचं घरी कसं स्वागत केलं याची झलक दाखवली आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. 

क्षिती जोगचे वडील अनंत जोग हे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. तर आई उज्वला जोगही बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. नुकतंच दोघंही क्षितीच्या घरी आले. दरम्यान क्षितीने छानसा फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हेमंत ढोमेनेच हा सेल्फी घेतलाय. हा फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर करत हेमंतने लिहिले, "सासू सासरे येती घरा...तोचि दिवाळी-दसरा..." हेमंतची ही गोड पोस्ट सर्वांच्याच पसंतीस पडली आहे.

क्षितीने वडिलांसोबतचा एक स्वतंत्र फोटो शेअर केलाय. तर दुसरा सेल्फी पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टवर झिम्माच्या कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. कमेंट बॉक्समध्ये कलाकारांची फुल धमाल मस्ती दिसून येत आहे. सिद्धार्थ चांदेकर, मिथिला पालकर, रोहित सराफ यांनी फोटोवर प्रेम व्यक्त केलं आहे. तर वडील मुलीचा फोटो पाहून दोन टॅलेंटेड कलाकार एकाच फ्रेममध्ये अशी कमेंट चाहत्यांनी केली आहे. 

हेमंत आणि क्षिती हे अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा सर्वच गोष्टी उत्तमरित्या साकारत आहेत. त्यांच्या आगामी सिनेमांची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीपरिवार