Join us  

Ashi Hi Banwa Banwi Movie Dialogues : धनंजय मानेंची बनवाबनवी झाली ३० वर्षांची ; हे आहेत गाजलेले संवाद !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 1:10 PM

Ashi Hi Banwa Banwi Movie Dialogues : या चित्रपटातला प्रत्येक विनोद अजूनही तितकाच ताजा असून ३० वर्षांनंतरही लिंबू कलरची ती साडी जणू नवी कोरी आहे.

पुणे : एखादा चित्रपट जनमानसाच्या मनावर किती खोल ठसा उमटवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. उत्तम अभिनय, प्रत्येक सीनमध्ये खळखळून हसवणारा विनोद आणि नाचायला लावणारी गाणी अशी उत्तम भट्टी जमून आलेला बनवाबनवी आज ३१व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. या चित्रपटातला प्रत्येक विनोद अजूनही तितकाच ताजा असून ३० वर्षांनंतरही लिंबू कलरची ती साडी जणू नवी कोरी आहे. 

 सचिन आणि सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे, अशोक सराफ आणि अश्विनी भावे, सुशांत रे आणि निवेदिता सराफ यांच्या अफलातून केमिस्ट्रीतून बनवाबनवी असा जमली की अजूनही बघणारा पोट `धरून हसतो. आज शंभर कोटींच्या क्लबची चर्चा असताना त्या काळात या सिनेमाने ३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. लेखक वसंत सबनीस यांनी लिहिलेले संवादांनी सिनेमात जान आणली होती. चला तर बघूया या सिनेमातले काही गाजलेले संवाद. 

परश्या : धनंजय माने इथेच राहतात का ? ठकठक 

 

धनंजय माने :अरे परशुराम ! मी म्हटलं होतं  ना, इस्राईलला जाणारा माझा मित्र परशुराम 

 

 विश्वासराव सरपोतदार : 'हा शुद्ध हलकटपणा आहे, माने !

 

शंतनू : दादा,  'हे बालगंधर्व ना' ?

धनंजय : हो, हे बालगंधर्व ना. 

शंतनू : आणि या मिसेस बालगंधर्व ना ?

धनंजय :हळू बोल लोक मारतील 

 

धनंजय : लिंबाचं लोणचं,लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण मला प्रचंड आवडत. लिंबाचं नाव जरी घेतलं तरी माझ्या तोंडाला नळासारखी धार लागते. 

लीलाबाई काळभोर : अगंबाई पार्वती काय हे,  तू चक्क विडी ओढतेस. ?

धनंजय माने : डोहाळे लागलेत हो कालपासून, सारख्या विड्या ओढतीये !

 

धनंजय : नमस्कार,मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती.  हा माझा भाऊ शंतनू आणि ही सुधा त्याचा बायको 

 

लीलाबाई काळभोर : वा छान आहे हो जोडा ! 

धनंजय माने : तोंडात मारण्यासारखा,  इतर जोडप्यांच्या !

 

सुधीर  : जाऊबाई...(मरणासन्न अवस्थेत)

परश्या : ''नका बाई इतक्यात जाऊ''  

सुधीर : मला सारखं वाटतंय, तुमच्या पोटी जन्म घेणार आहे.

परश्या : अरे माझ्या पोटी फक्त चिंध्या येणारेत 

टॅग्स :अशोक सराफलक्ष्मीकांत बेर्डेसचिन पिळगांवकरनिवेदिता सराफ