Join us

मराठमोळ्या संस्कृती बालगुडेच्या सोज्वळ अदा पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा तिचे फोटो आणि व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 07:00 IST

अभिनेत्री संस्कृती बालगुडे बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येत असते. आता ती पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येत असते. आता ती पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिने नवीन फोटोशूटमधील काही फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातील तिच्या सोज्वळ अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. 

संस्कृती बालगुडेने इंस्टाग्रामवर फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने म्हटले की, जब तुमसे नज़र टकराई सनमजज़बात का एक तूफ़ान उठा....

संस्कृती बालगुडेने नवीन फोटोशूटमध्ये लाल रंगाची साडी नेसली आहे. त्यावर तिने साजेशे असे दागिने परिधान केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमधील तिच्या सौंदर्यांने आणि सोज्वळतेने चाहत्यांचे मन जिंकले आहे. तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. तिचे या साडीतील फोटो व व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

 संस्कृती बालगुडेचा आगामी चित्रपट  '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमाचा काही दिवसांपू्रवी मुहूर्त पार पडला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी दमदार स्टारकास्ट आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.

संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच तिने 'सांगतो ऐका', निवडुंग, शिव्या, एफयु या चित्रपटात काम केले आहे. 

टॅग्स :संस्कृती बालगुडे