Join us

मंगलगाणी दंगलगाणी या कार्यक्रमाचे यंदा ३० वे वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 14:47 IST

मराठी वाद्यवृंदाच्या इतिहासात एक वेगळा प्रयोग म्हणून रसिकमान्यता आणि लोकप्रियता मिळालेल्या मंगलगाणी दंगलगाणी या कार्यक्रमाचे यंदा ३० वे वर्ष ...

मराठी वाद्यवृंदाच्या इतिहासात एक वेगळा प्रयोग म्हणून रसिकमान्यता आणि लोकप्रियता मिळालेल्या मंगलगाणी दंगलगाणी या कार्यक्रमाचे यंदा ३० वे वर्ष आहे. ७ आॅगस्ट १९८७ मध्ये मंगलगाणी दंगलगाणी पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे झाला होता. संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानापासून ते पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या कसाईदानापर्यंतचा मराठी गाणी, संगीत व संस्कृतीचा संगीतमय इतिहास सादर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आत्तापर्यंत १ हजार ९०० प्रयोग झाले असून येत्या ४ ते ७ आॅगस्ट या कालावधीत मुंबई व ठाणे परिसरात या कार्यक्रमाचे खास प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. अभंग, वामन पंडित, मोरोपंत यांचे काव्य, शाहिरी काव्य, पोवाडे, लावणी, गवळण, नाटयसंगीत, भावसंगीत, सुगमसंगीत, चित्रपट गीते असा महाराष्ट्राचा सांगीतिक ठेवा या कार्यक्रमातून उलगडला जाणार आहे. गेला.