भुषणचे वर्कआऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 10:37 IST
सिक्स पॅक अॅब्सची क्रेझ सध्या सगळ््याच तरुणांमध्ये पहायला मिळत आहे. जिम जॉईन करुन घाम ...
भुषणचे वर्कआऊट
सिक्स पॅक अॅब्सची क्रेझ सध्या सगळ््याच तरुणांमध्ये पहायला मिळत आहे. जिम जॉईन करुन घाम गाळेपर्यंत वर्कआऊट करायचे अन सिक्स पॅक बनवायचे वेड सगळ््यांमध्येच दिसत आहे. मग अशात आपले सेलिब्रिटीज तरी कसे काय मागे राहतील बरं. एखाद्या भुमिकेसाठी वेट गेन करणे किंवा अॅक्शन सीन्स करायचेत म्हणुन किंवा अँग्री लुकमध्ये दिसायचेय म्हणुन बॉडी करुन मस्तपैकी शर्ट लेस होऊन पॅक दाखविणारा हिरो भाव खाऊन जातो. अभिनेते त्यांच्या फिजिक विषयी अतिशय केअरिंग असतात हे तर आपल्याला माहितच आहे. भुमिकेसाठी सडेतोड मेहनत करुन बॉडी बनविणाºया अॅक्टर्समध्ये आता आपल्या हॅन्डसम हंक भुषण प्रधान याच्या देखील समावेश झाला आहे. भुषणने रोमँटिक भुमिका केल्या आहेत तो आता त्याच्या आगामी चित्रपटात अॅक्शन करण्यासाठी सज्ज झाला असुन त्यासाठी जिम मध्ये जाऊन प्रचंड मेहनत घेत आहे. त्याने सोशल साईटवर वर्क आऊट करतानाचे फोटो अपलोड केले असुन यामध्ये त्याची मेहनत दिसुन येत आहे.