Join us

मराठमोळा सनी पवारची आॅस्कर सोहळयात ही होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 13:57 IST

सध्या आॅस्कर सोहळयाची चर्चा खूपच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या सोहळयाला कोण कलाकार उपस्थित राहणार यांच्यापासून ते कोणाची ...

सध्या आॅस्कर सोहळयाची चर्चा खूपच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या सोहळयाला कोण कलाकार उपस्थित राहणार यांच्यापासून ते कोणाची चर्चा होणार याचाच बोलाबाला सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, आॅस्कर पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत लायन नावाचा चित्रपट आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावरही सुरु आहे. लायन चर्चेत येण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे या चित्रपटासाठी भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल यालासुद्धा आॅस्करसाठीचे नामांकन मिळाले आहे. त्यामुळे या आॅस्कर सोहळयात त्याला पुन्हा यश मिळते का हे पाहण्यासारखे आहे. त्याचबरोबर लायनच्या निमित्ताने देवसोबतच आणखी एक चेहरा चर्चेत आला आहे. तो म्हणजे मराठमोळा बालकलाकार सनी पवार.         नुकत्याच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब आणि इतर पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्याच चेहºयावर अनेकांच्या कुतुहलपूर्ण नजरा खिळल्या होत्या.  मुंबईचा सनी पवार सध्या आॅस्कर आणि हॉलिवूडमधील सर्वांचे लक्ष वेधणारा बालकलाकार ठरला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याचा अंदाज, बहुत, बहुत अच्छा लगा असं म्हणत मोजक्या पण तितक्याच खºया भावनेने प्रश्नांची उत्तरं देणारा सनी सर्वाचे मन जिंकण्यात यशस्वी झाला आहे.अ‍ॅक्सेस हॉलिवूड या युट्यूब वाहिनीद्वारे सनीच्या एका मुलाखतीतील काही भाग प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सनीची ही मुलाखत आकर्षणाचा विषय ठरत आहे. लायन या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच हॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाºया सनी पवारने ही सर्व दुनिया त्याच्या नजरेतून आणि त्याच्या शब्दांतून या मुलाखतीत व्यक्त केली आहे. हॉलिवूड चित्रपटसृष्टीत कोणत्या कलाकाराला भेटण्याची तुझी इच्छा आहे असे विचारले असता सनीने निरागसपणे, ह्यडब्ल्यू डब्ल्यू इ मधल्या काही आवडत्या खेळाडूंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. इंग्रजी भाषा येत नसतानाही ज्या आत्मविश्वासाने सनी हॉलिवूडमध्ये कलाकारांसोबत वावरतो, प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देतो हे खरंच कौतुकास्पद आहे.