Join us

भार्गवी कशाला कंटाळली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 09:56 IST

अभिनेत्री भार्गवी चिरमुले नेहमीच आपल्याला एकदम टिपिकल लुकमध्येच दिसते. मालिका असो किंवा चित्रपट भार्गवीला प्रेक्षकांनी अतिशय सोज्वळ रूपातच आजवर ...

अभिनेत्री भार्गवी चिरमुले नेहमीच आपल्याला एकदम टिपिकल लुकमध्येच दिसते. मालिका असो किंवा चित्रपट भार्गवीला प्रेक्षकांनी अतिशय सोज्वळ रूपातच आजवर पाहिले होते. परंतु आता भार्गवीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे, लवकरच भार्गवी आपल्याला एकदम मॉडर्न अंदाजात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कौटुंबिक भूमिका केल्यानंतर भार्गवी पहिल्यांदाच प्रेक्षकांना ग्लॅमरस रूपात चित्रपटात दिसणार आहे. यासंदर्भात लोकमत सीएनएक्सशी बोलताना भार्गवी सांगते, ''त्याच त्याच प्रकारच्या भूमिका करून मला खरेच कंटाळा आला होता. प्रेक्षकांनी मला सुनेच्या, पत्नीच्या भूमिकेत पाहिले आहे.''  माझी ही इमेज बदलायची आहे. मॉर्डन मुलीची भूमिका ही मी तितक्याच चांगल्या पद्धतीने साकारू शकते हे मला दाखवून द्यायचे आहे. एक अभिनेत्री म्हणून काम करताना तुम्हाला प्रत्येक भूमिका ही सशक्तपणे करताच आली पाहिजे. स्वत:ला एकाच साच्यात अडकवून न ठेवता नेहमीच स्वत:मध्ये काही बदल करणे आवश्यक असते. मग ती भूमिका असो किंवा तुमचा लुक प्रेक्षकांसमोर सतत वेगळ्या अंदाजात येणे गरजेचे आहे असेही भार्गवीने सांगितले आहे. मी मध्यंतरीच एक मॉडर्न फोटोशूट केले होते. त्यानंतर मला अनेक दिग्दशकांचे चित्रपटांसाठी फोन आले. काही भूमिका मला आवडल्या. त्यामुळे मी लवकरच एखादया ग्लॅमरस गर्लच्या भूमिकेत तुम्हाला दिसूही शकते असे भार्गवी सांगते. खरेय म्हणा, जर व्हर्सटाईल रोल केले नाही तर प्रेक्षकदेखील कंटाळून जातात. त्यामुळे प्रेक्षकांना खूश ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळ्या रूपात आणि दमदार भूमिका कराव्याच लागतात. आता भार्गवी नक्की कोणत्या भूमिकेत आणि कशा लुकमध्ये प्रेक्षकांसमोर येतेय हे पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना नक्कीच लागली असणार.