अभिनेत्री गायत्री सोहम हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. गायत्रीने मालिका आणि चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता गायत्रीचे रक्षण सिजर करणार हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, हा सिजर कोण? आणि तो गायत्रीचे रक्षण का करणार आहे. तर जास्त विचारात पडू नका. सिजर हा गायत्रीचा नवीन कुत्रा आहे. गायत्रीला डॉगी आवडत असल्याने तिने नुकताच हा क्युट पपी घेतला आहे. सध्या तिच्या घरी आलेल्या या नव्या पाहुण्याच्या स्वागतात ती व्यस्त आहे. सिजर हा अमेरिकन कुत्रा आहे. नुकताच गायत्रीने या सिजर सोबतचा एक फोटो सोशल साईट्सवर अपलोड केला आहे. याविषयी गायत्री सांगते, ''आपल्याकडे छानसा कुत्रा असावा असे मला नेहमीच वाटायचे. म्हणूनच मी सिजरला घेतले आहे.'' सिजर हा अतिशय आक्रमक आहे. जगातील आक्रमक कुत्र्यांपैकी एक असणारा हा आहे. खरेतर माझा बंगला फार मोठा आहे आणि त्यामुळेच मी संरक्षणासाठी सिजरला घेतले आहे. हा आक्रमक असला तरी फारच गोड आहे. सिजरच्या येण्याने घरातील संपूर्ण वातावरणच बदलले आहे. सध्या मी नाशिकला माझ्या घरी सिजरला ठेवले आहे. मुंबईमध्ये घरं फार मोठी नसतात त्यामुळे तिथे मी सध्या तरी सिजरला घेऊन जाणार नाही. काही दिवस मी नाशिकमध्ये असून सिजरसोबत मस्त एन्जॉय करत असल्याचे गायत्रीने सांगितले आहे.
गायत्री कोणासोबत घालवतेय वेळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 09:56 IST