Join us

क्षिती कोणासाठी बनवतेय लाडू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 09:33 IST

प्रत्येकाला सेलिब्रिटींच्या आयुष्यातील घडणाऱ्या  गोष्टी ऐकण्यात रस असतो. कलाकार काय करतात, कुठे असतात, कसे राहतात असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या ...

प्रत्येकाला सेलिब्रिटींच्या आयुष्यातील घडणाऱ्या  गोष्टी ऐकण्यात रस असतो. कलाकार काय करतात, कुठे असतात, कसे राहतात असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या डोक्यात येत असतात. तसेच कलाकारांना स्वयंपाक येतो का हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. पण प्रेक्षकांच्या या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्री क्षिती जोग हिने दिले आहे.नुकतेच क्षितीने स्वत: लाडू तयार करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. हे लाडू करताना फार मजा आली असल्याचेदेखील तिने सोशल मीडियावर सांगितले आहे. क्षितीचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटले आहे. क्षितीचे लाडू बनवतानाचे फोटो पाहिल्यावर तिच्या चाहत्यांनी तिचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे.तसेच क्षिती तुझ्या हातचे लाडू आम्हाला ही खायला आवडतील असे मजेशीर कमेंटदेखील केल्या आहेत. क्षितीची 'दामिनी' आणि 'वादळवाट' या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच तिने ये रिश्ता क्या कहलता है, साराबाई वसेस साराबाई अशा हिंदी मालिके तूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे.                                त्याचबरोबर क्षितीने संशय कल्लोळ, माई असे चित्रपटदेखील केले आहेत. तर सूर्याची पिल्ले हे नाटकामधूनदेखील तिने आपला अभिनय प्रेक्षकांपर्यत पोहोचविला आहे. नाटक, मालिका, चित्रपटाने क्षितीने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्यामुळे क्षितीचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांच्या  पसंतीस उतरला असणार हे नक्की.