Join us  

एकेकाळी सलमानसोबत तुलना होणारा 'हा' स्पर्धक बिग बॉसमध्ये घेतोय सर्वात कमी मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 1:17 PM

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारा हा स्पर्धक सर्वात कमी मानधन घेणारा सेलिब्रिटी ठरला आहे. 

ठळक मुद्दे'बिग बॉस १५' मध्ये अभिनेता सिम्बा नागपाल (Simba Nagpal) सहभागी झाल्यापासून त्याची चर्चा सुरु आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस. यंदा या शोचं १५ वं (Bigg Boss 15) पर्व पार पडत असून अनेक ओळखीचे तर काही अनोळखी चेहरा या शोमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यातच हे पर्व सुरु झाल्यापासून घरातील प्रत्येक स्पर्धकाची सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. कमी कालावधीत फॅन फॉलोअर्स तयार करणारे हे स्पर्धक बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात धुमाकूळ घालत असून यातील एक स्पर्धक सध्या इंटरनेटवर सर्वाधिक चर्चिला जात आहे. त्यामागचं कारणदेखील तसंच असल्याचं पाहायला मिळतं. 

बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. मात्र, यामध्ये एका स्पर्धकांची विशेष चर्चा रंगली आहे. बिग बॉसमध्ये सहभागी झालेला हा स्पर्धक छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असून कधी काळी त्याची तुलना अभिनेता सलमान खानसोबत (Salman Khan) केली जायची. परंतु, आता बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारा हा स्पर्धक सर्वात कमी मानधन घेणारा सेलिब्रिटी ठरला आहे. 

Bigg Boss 15: अफसाना-शमिताचा किसिंग Video व्हायरल

'बिग बॉस १५' मध्ये अभिनेता सिम्बा नागपाल (Simba Nagpal) सहभागी झाल्यापासून त्याची चर्चा सुरु आहे. छोटा पडदा गाजवणारा हा अभिनेता रोडिज (Roadies) पासून 'स्प्लिट्सविला' (Splitsvilla) पर्यंत अनेक साहसी शोमध्ये सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे त्याची पर्सनालिटी आणि फिटनेस पाहून एकेकाळी चाहते त्याची तुलना सलमान खानसोबत करत होते. परंतु, भाईजानला टक्कर देणारा हा स्पर्धक सध्या अत्यंत कमी मानधन घेत असल्याचं पाहायला मिळतं. 

बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेला सिम्बा नागपाल याची तुलना सलमान खानसोबत केली जाते. मात्र, या शोमध्ये सहभागी झालेल्या सिम्बाला सर्वात कमी मानधन देण्यात येतं. सिम्बाला एका दिवसासाठी केवळ १५ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे त्यांची आठवड्याची कमाई १ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतं. 

दरम्यान, सिम्बा नागपाल याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. कलाविश्वाप्रमाणेच सिम्बा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तो त्याचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर  करत असतो. 

टॅग्स :बिग बॉससलमान खानटेलिव्हिजन