Join us

कोणत्या मराठी चित्रपटाला बिग बी आणि सलमान खान यांनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 15:59 IST

सध्या बॉलिवुड आणि मराठी चित्रपटसृष्टीचे जिव्हाळा वाढत चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटांचा मुहुर्त असो या प्रिमीयर बॉलिवुड ...

सध्या बॉलिवुड आणि मराठी चित्रपटसृष्टीचे जिव्हाळा वाढत चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटांचा मुहुर्त असो या प्रिमीयर बॉलिवुड कलाकार हे आवर्जुन उपस्थिती लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, महेश मांजरेकर दिग्दर्शित ध्यानीमनी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला थेट बॉलिवुडचे तगडे कलाकार बिग बी अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी सोशलमीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून महेश मांजरेकर आणि आश्विनी भावे प्रेक्षकांना एकत्रित पाहायला मिळणार आहे. ब-याच वर्षानंतर रुपेरी पडद्यावर अश्विनी भावे यांनी पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांचे लाडके कलाकार अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडेदेखील या चित्रपटात झळकणार आहे. महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहता हा चित्रपट  कौटुंबिक जीवनावर आधारित आहे असा अंदाज बांधला जात आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे. यापूर्वी प्रेक्षकांनी महेश मांजरेकर यांच्या अनेक चित्रपटांना पसंती दर्शवली होती. नटसम्राट या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. सध्या महेश मांजरेकर एफयु या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अनेक नवोदित कलाकार पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सैराटचा परश्या म्हणजेच आकाश ठोसरदेखील एफयू या चित्रपटात झळकणार आहे. }}}}}}}}