Join us

मिलिंद सोमण अनवाणी धावतो तेव्हा…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 14:33 IST

५० वर्षाच्या मिलींद सोमण याने असे काही केले आहे की त्याच्याहून कमी वय असणाऱ्या व्यक्तिही असा विचार करण्यापूर्वी किमान १० वेळा तरी विचार करतील.‘मोबीफिट’ आयोजित ‘द ग्रेट इंडिया रन’साठी आयर्नमॅन मिलिंद सोमण अहमदाबाद ते मुंबई अनवाणी धावतो आहे.

५० वर्षाच्या मिलींद सोमण याने असे काही केले आहे की त्याच्याहून कमी वय असणाऱ्या व्यक्तिही असा विचार करण्यापूर्वी किमान १० वेळा तरी विचार करतील.‘मोबीफिट’ आयोजित ‘द ग्रेट इंडिया रन’साठी आयर्नमॅन मिलिंद सोमण अहमदाबाद ते मुंबई अनवाणी धावतो आहे. या दोन्ही शहरांमधले अंतर ५२७ किमी आहे. गेल्या वर्षी जगात अत्यंत खडतर अशी ट्रायथलॉन त्याने पूर्ण केली होती.मिलिंद सोमणने ५२७ किमीपैकी १३० किमीचे अंतर पहिल्या दोन दिवसातच पूर्ण केले होते. पहिल्या दिवशी ६७ किमीचे अंतर पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी ६२ किमीचे अंतर कापले. तिसऱ्या दिवशी कडक ऊन असूनही भरुचपर्यंतचे ६२ किमी अंतर त्याने कापले. चौथ्या दिवशीही ६२ किमीचे अंतर त्याने पूर्ण केले. पाचव्या दिवशी ६५ किमी अनवाणी धावून तो नवसारीपर्यंत पोहचलेला.सहा राज्यांमध्ये होणार द ग्रेट इंडियन रन२७ जुलै पासून सुरु झालेली ही ‘द ग्रेट इंडियन रन’ ६ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून ही होणार आहे. यात जगभरातल्या १५ अल्ट्रा मॅरोथॉन धावपटूंनी भाग घेतला आहे.