Join us
Daily Top 2Weekly Top 5

भार्गवीला कशाचे आले दडपण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 17:09 IST

   अभिनेत्री भार्गवी चिरमुले एक चांगली अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगणा आहे हे तर सर्वांनाच माहितीये. भार्गवी आता प्रेक्षकांसमोर ...

 
 
 अभिनेत्री भार्गवी चिरमुले एक चांगली अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगणा आहे हे तर सर्वांनाच माहितीये. भार्गवी आता प्रेक्षकांसमोर जोधाच्या भूमिकेत आली आहे. तुम्ही म्हणाल कि भार्गवीने कोणत्या चित्रपटात जोधीची भूमिका साकारली आहे का? तर तसे अजिबातच नाही. भार्गवी जोधा झाली आहे ती एक संगीत नाटकामध्ये.   मुगले ए आझम या सांगितीक नाटकात ती जोधाची भूमिका साकारते आहे. सध्या या नाटकाचे प्रयोगदेखील सुरु आहेत. भव्य-दिव्य असे हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसते आहे. जोधाच्या भूमिकेसाठी भार्गवी उर्दु भाषा शिकली आहे. उर्दु भाषा ही बोलायला जरा कठीण असली तरीही  भूमिका करताना शंभर टक्के योगदान देऊनच ही भूमिका साकारायची असा पवित्रा भार्गवीने उचलला होता.  याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना भार्गवी सांगते, ''  मुगले ए आझम हे सांगितीक नाटक माझ्यासाठी एक बिग ड्रीम प्रोजेक्ट आहे. या नाटकासाठी मी फार मेहनत घेतली आहे. उर्दु बोलायला शिकले. या आधी दुर्गा खोटे यांनी जोधाची भूमिका चित्रपटात साकारली होती. त्यामुळे या नाटकात जोधा साकारताना माझ्यावर जरा दडपणच होते. जोधाची भमिका करायची म्हणजे एक आव्हानच होते.'' जोधा रजपुत असल्याने माझ्यासाठी घागरा डिझाईन करण्यात आला होता. मनिष मल्होत्राने सर्वांचेच ड्रेस डिझाईन केले होते. या नाटकासाठी मला एकदम भरजरी दागिने घालावे लागत आहेत. या नाटकाचे प्रयोग दिल्लीमध्ये देखील होणार आहेत. नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. कोणत्याही कलाकारासाठी ही आनंदाची बाब असते.