Join us

पुरावाच काय आहे अमेरिकेला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:32 IST

एका घरात समविचारीच माणसं असतात किंवा सगळे विरुद्ध विचारांचे असतात, अशी परिस्थिती शक्यतो कधी पाहायला मिळत नाही. पण त्यामुळे ...

एका घरात समविचारीच माणसं असतात किंवा सगळे विरुद्ध विचारांचे असतात, अशी परिस्थिती शक्यतो कधी पाहायला मिळत नाही. पण त्यामुळे अनेक विषयांवर चर्चाही घडतात. काही वर्षांपूर्वी अमेरिकेबद्दल मध्यमवर्गीयांच्या मनात खूप कुतूहल होते आणि त्याच वेळी अमेरिकेबद्दल खूप संतापही होता. याच गोष्टींच्या भोवती फिरणारं एक नवीन नाटक सध्या रंगमंचावर आलंआहे. तशी गोष्ट साधीच असली तरी वेगळी आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. साधारण तीस वर्षांपूर्वी जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहू लागण्याच्या आधीच्या काळात अमेरिका हा सर्वसामान्यांच्याबाबतीत औत्सुक्याचा विषय होता. त्याचं जितकं अप्रूप होतं तितकंच डाव्या विचारसरणीवर चालणार्‍यांच्या आणि नवभांडवलदारी व्यवस्थेबद्दल राग असणार्‍या गटात अमेरिकेबद्दल प्रचंड संताप होता. तो अनेक वेळा टोकाच्या पातळीवरही जात असे. अशा काहीशा गटाचं नेतृत्व करणार्‍या जयंतरावांच्या घरात खुद्द त्यांच्याच विचारसरणीला हाणून पाडणारे दोन तरुण आहेत. आधुनिकता आणि तिला विरोध करणारा देशीवाद असा संघर्ष त्यांच्यात उभा राहतो. आणि या तात्विक वादाचं रूप भावनिक पातळीवर येऊन स्फोटक होतो. अशी या नाटकाची कथा आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अभिजित झुंजारराव यांनी केले असून अभिनय, कल्याण निर्मिती करीत आहे. राहुल शिरसाट, नेहा अष्टपुत्रे, दर्शना रसाळ, सोनाली मगर, बाबू आवडे, रोशन मोरे आदी कलाकार यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.