Join us

​ बघतोस काय मुजरा कर, येणार ३ फेब्रुवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 12:15 IST

हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा बरेच दिवस सिनेवर्तुळात चालली होती. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा ...

हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा बरेच दिवस सिनेवर्तुळात चालली होती. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टिझर पाहता या चित्रपटात नक्कीच काहीतरी भन्नाय असणार याची कल्पनाच येते. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या चित्रपटातून देण्यात येणार असल्याचे हेमंत ढोमे याने सांगितले होते. बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाच्या नावावरुन लगेच लक्षात येते की हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणार किंवा त्यांच्या विचारांवर लक्ष केंद्रित करुन सध्याच्या पिढीला मार्गदर्शन करणारा असावा.. माज्या राजाला, माज्या शिवबाला मानाचा मुजरा...चला महाराष्ट्राचं वैभव परत आणुया... असं म्हणत नुकतच या सिनेमाचं नवीन टिझर पोस्टर प्रदर्शित केलं आहे, आणि बरं का तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही कारण ३ फेब्रुवारी २०१७ ला सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज देखील झाला आहे. महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांची गड अन किल्ले... काय अवस्था करुन ठेवली आहे आपण? जिथे महाराजांनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वत:चं रक्त सांडलं तिथे बसून दारु प्यावी, गुटखा खाऊन थुकावं हा विचार कुठून येत असेल? इंग्रजानी इतिहास कसा जपून ठेवला आहे. आपल्याकडे होईल का असं? असे कित्येक प्रश्न या टिझर मध्ये विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांचा विचार केला असता, आपल्याला पण मनात असे लाजीरवाणे प्रश्न उपस्थित होतात.  एवरेस्ट एंटरटेनमेंट, गणराज प्रॉडक्शन प्रस्तुत, हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचं टिझर पोस्टर पाहून यात जितेंद्र जोशी, अक्षय टंकसाळे, अनिकेत विश्वासराव या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. चला तर मग महाराष्ट्राचं वैभव येत्या ३ फेब्रुवारी २०१७ ला परत आणूया... हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली असणार आहे. फक्त आता तुम्हाला काहीच दिवस महाराजांची ही शौर्य गाथा पाहण्यासाठी वाट बघावी लागणार आहे.