Join us

दिवाळीत प्रियाला कसल्या मिळतायेत ऑर्डर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 17:38 IST

         अभिनेत्री प्रिया मराठेने अनेक मालिका आणि चित्रपटातून तिच्या खलनायकी अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवले ...

 
 
       अभिनेत्री प्रिया मराठेने अनेक मालिका आणि चित्रपटातून तिच्या खलनायकी अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवले होते. रसिकांच्या लाडक्या प्रियाने दिवाळीसाठी खास आकाश कंदील बनवला आहे. प्रियाने यंदाच्या दिवाळीत मस्त घरीच आकाश कंदिल तरयार केले आहेत. या कंदीलचे फोटे तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे. प्रियाच्या चाहत्यांनी या फोटोला लाईक्स देत  तिच्याकडे आकाश कंदीलची बनवण्याची ऑर्डरही दिली आहे. याविषयी प्रियाने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले, ''मला कंदील करायला फर आवडतात. मी लहानपणा पासूनच घरात दर दिवाळीला कंदील बनवायचे. मला तेव्हा फार मजा यायची. पण आता शूटिंगच्या गडबडीमुळे या गोष्टी करायला फार वेळ मिळत नाही.'' यंदा मला या दिवाळीत छान वेळ मिळाल्याने मी घरीच कंदील करायचे ठरवले. मी दोन ते तीन कंदील या दिवाळीत तयार केलेत. त्यातील एक मी माझ्या माहेरी पाठवला एक सासरी आणि एक माझ्याघरी ठेवला. बाहेरच्या वस्तू विकत घेण्यापेक्षा घरात काही केले तर त्याचा जास्त आनंद मिळतो. घरी कंदील बनविण्याची मजाच काही और असते. या फोटो सोबतच प्रियाने गमतीत होम मेड का जमाना है असेही पोस्ट केले आहे. सतत शूटिंगच्या धावपळीत व्यस्त असलेल्या कलाकारांना सणावारातही घरच्यांसाठी वेळे देणे शक्य होत नाही. मग एखाद वेळेस जर वेळ मिळालाच तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टीतून कलाकार आनंद साजरा करतात.