Join us

WEDDING Anniversary:स्वप्नील जोशीने पत्नीला रोमँटिक अंदाजात दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 14:28 IST

पहिल्याच दिवशी असे सूर जुळले की, रात्री दोन वाजेपर्यंत ते गप्पा मारत होते. स्वप्निल आणि लीनाने पहिल्याच भेटीत एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्वप्निलने लीनाला पहिल्याच भेटीत एक अट घातली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी आणि त्याची पत्नी लीना आराध्ये-जोशी  सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. स्वप्नीलही पत्नी लीना ची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.

बिझी शेड्युअलमध्ये एकमेकांना वेळे देणं आणि त्याची सांगड घालणं दोघांसाठी तितकंसं सोपं राहिलेलं नाही. मात्र तरी जीवनातील काही विशेष प्रसंगी त्यांनी आजवर एकमेकांसाठी वेळ राखून ठेवतात. यांच्या लग्नाचा आज नववा वाढदिवस आहे. या खास दिवशी स्वप्नीलने हटके अंदाजात आपल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर लीनासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.

स्वप्नील-लीना 16 डिसेंबर 2011 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले होते.स्वप्निल आणि लीना यांचे अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे त्यांचा रितसर बघण्याचा कार्यक्रम झाला होता. परंतु हा कार्यक्रम काही टिपिकल कांदे-पोह्याचा नव्हता. तर या दोघांची पहिली भेट एका कॉफी शॉपमध्ये झाली होती. लीना स्वप्निलची वाट बघत कॉफी शॉपमध्ये बसली होती. त्या दिवशी स्वप्निल रात्री साडे अकरा पर्यंत शूटिंग करत होता. शूटिंग संपवून तो लेट नाईट लीनाला भेटायला कॉफी शॉपमध्ये आला. एक मुलगी आपली वाट बघत एवढ्या रात्री थांबते यावरुनच तो इम्प्रेस झाला होता. मग दोघेही मस्त गप्पा मारत होते.

पहिल्याच दिवशी असे सूर जुळले की, रात्री दोन वाजेपर्यंत ते गप्पा मारत होते. स्वप्निल आणि लीनाने पहिल्याच भेटीत एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्वप्निलने लीनाला पहिल्याच भेटीत एक अट घातली होती. त्याने सांगितले होते की, तू लग्नानंतर माझ्या आई-वडिलांसोबत राहावे अशी माझी इच्छा आहे. परंतु स्वप्निल काही बोलण्याच्या आधीच लीनाने या गोष्टीला होकार दिला.

मायरा आणि राघवची त्यांच्या मुलांची नावं आहेत. लग्नाच्या नऊ वर्षानंतरही दोघांतील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. लीनादेखील  खंबीरपणे स्वप्निलच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते. 

टॅग्स :स्वप्निल जोशी