Join us

​वॅक्स म्युझियममध्ये उभारणार आर्ची, परशा, नागराजचे मेणाचे पुतळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 10:34 IST

 मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणाऱ्या सैराट चित्रपटाने सर्वांनाच याड लावलयं. दिवसेंदिवस आर्ची आणि परशाची क्रेझ वाढत असून या दोघांसह दिग्दर्शक ...

 मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणाऱ्या सैराट चित्रपटाने सर्वांनाच याड लावलयं. दिवसेंदिवस आर्ची आणि परशाची क्रेझ वाढत असून या दोघांसह दिग्दर्शक नागराज मुंजळे यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. लोणावळ्यातील कलावंत सुनील कंडलूर यांनी हे काम हाती घेतले आहे.लंडन येथील मादाम तुसॉं या वॅक्स म्युझियमच्या धर्तीवर काही वर्षांपूर्वी लोणावळ्यातही वॅक्स म्युझियम उभारण्यात आले. आतापर्यंत अनेक लोकप्रिय व्यक्तींचे मेणाचे पुतळे इथे तयार करण्यात आले आहेत. महात्मा गांधी, शिवाजी महाराज, अण्णा हजारे, कपिल देव, अमिताभ बच्चन यांचा यात समावेश आहे.