Join us  

'बकेट लिस्ट'वेळी वंदना गुप्तेंनी माधुरी समोर ठेवली होती 'ही' अट; 'धकधक गर्ल'ला करावी लागली होती मान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 2:53 PM

Vandana gupte: वंदना गुप्ते यांनी माधुरीसमोर ठेवलेली अट तिला मान्य करावी लागली होती. हा किस्सा नुकताच वंदना गुप्ते यांनी शेअर केला आहे.

वंदना गुप्ते (vandana gupte) हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकवर्गाला नवीन नाही. आजवरच्या कारकिर्दीत वंदना यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्या बाईपण भारी देवा या सिनेमात झळकल्या होत्या. वंदना गुप्ते यांनी आजवर असंख्य मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. यात  २०१८ मध्ये रिलीज झालेल्या बकेट लिस्ट या माधुरी दीक्षितच्या (madhuri dixit) सिनेमातही झळकल्या होत्या. नुकताच त्यांनी या सिनेमाचा अनुभव 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

"आमच्या सिनेमाचं शुटिंग मढला झालं होतं. आतापर्यंत मी तिच्यासोबत एकाच सिनेमात काम केलं होतं. रिडिंगच्या वेळी पहिल्यांदाच मी तिला पाहिलं. त्यावेळी अगदी साधी आणि छान तयार होऊन आली होती. तिला पहिल्याच दिवशी सांगितलं की, मला तिच्यासोबत काम करायची खूप इच्छा होती" असं वंदना गुप्ते म्हणाल्या. सोबतच त्यांनी माधुरीपुढे एक अट ठेवली होती हेदेखील सांगितलं.

पुढे त्या म्हणतात, "तुझं काय ते मला माहिती नाही पण, माझी एक अट आहे ती म्हणजे…तू माझ्याबरोबर रोज एक सेल्फी काढायचा. त्यानंतर मी विसरले तरी माधुरी आठवणीने सेल्फी काढायची. आमचे बरेच सेल्फी मी शेअर केले आहेत. संसार सांभाळून, मराठी संस्कृती-परंपरा जपून तिने दोन मुलांचा उत्तम सांभाळ केला आहे. जगभरात काम करुनही ती अत्यंत साधेपणाने राहते. सतत हिंदीत काम केल्यामुळे मराठीतील कठीण शब्दांचा उच्चार करतांना तिला अडचण यायची. पण, अशावेळी ती आवर्जुन आम्हाला तिची अडचण विचारायची.

दरम्यान, वंदना गुप्ते सोशल मीडियावर सक्रीय असून त्या कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात त्यांनी माधुरीसोबतही अनेक फोटो शेअर केले आहेत. 

टॅग्स :वंदना गुप्तेमाधुरी दिक्षितबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा