वैभव एेवजी गिश्मिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 13:57 IST
वैभव तत्त्ववादीने तुझे माझे जमेना या महेश मांजरेकर यांच्या मालिकेत काम केले होते. तसेच बाजीराव मस्तानी या चित्रपटातही ते ...
वैभव एेवजी गिश्मिर
वैभव तत्त्ववादीने तुझे माझे जमेना या महेश मांजरेकर यांच्या मालिकेत काम केले होते. तसेच बाजीराव मस्तानी या चित्रपटातही ते दोघे एकत्र झळकले होते. वैभव हा खूप चांगला कलाकार असल्याचे मांजरेकरांचे म्हणणे आहे. त्यामुळे मांजरेकरांना त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्याला एका चित्रपटासाठी मांजरेकरांकडून विचारण्यात आले होते. पण वैभवकडे तारखाच नसल्याने त्याला त्यांच्यासोबत काम करणे शक्य होणार नाहीये. यामुळे आता महेश यांची निर्मिती असलेल्या चित्रपटात वैभव ऐवजी गश्मिर महाजनी झळकणार असल्याची चर्चा आहे