Join us

​उमेश कामतला नव्हे तर या गोष्टीला प्रिया बापट करतेय मिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 15:41 IST

उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी इंडस्ट्रीतील एक क्यूट कपल मानले जाते. ते दोघे अनेक कार्यक्रमांना, समारंभाना एकत्र ...

उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी इंडस्ट्रीतील एक क्यूट कपल मानले जाते. ते दोघे अनेक कार्यक्रमांना, समारंभाना एकत्र हजेरी लावतात. त्यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री खूपच चांगली आहे आणि ही केमिस्ट्री लोकांना अनेकवेळा पाहायला देखील मिळते. प्रियाच्या करियसाठी गेले वर्षं हे खूप चांगले होते. वजनदार या चित्रपटात प्रेक्षकांना तिला एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. या भूमिकेचे प्रेक्षकांनी खूप चांगले कौतुक देखील केले होते. पुढील काळदेखील तिच्यासाठी खूप चांगला आहे. गच्ची, आम्ही दोघी या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना तिला मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आम्ही दोघी या चित्रपटात प्रिया आणि मुक्ता बर्वे एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाद्वारे दोन आघाडीच्या अभिनेत्रींना प्रेक्षकांना एकाच चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट खूपच खास असणार आहे. प्रिया सध्या तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात प्रचंड व्यग्र आहे. पण असे असले तरी एका गोष्टीला ती खूप मिस करत आहे. प्रिया चित्रीकरणात व्यग्र असल्याने उमेशला मिस करत असेल असेच तुम्हाला वाटत असेल. पण असे नाहीये. प्रिया उमेशला नव्हे तर तिच्या जुन्या हेअर स्टाईलला मिस करत आहे. प्रिया तिच्या हेअर स्टाईलला मिस करत असल्याचे तिनेच सोशल मीडियावर म्हटले आहे. तिने तिचा एक जुना फोटो शेअर करून डिअर शॉर्ट हेअर, मला तुझी आठवण येतेय असे तिने म्हटले आहे. प्रिया बापट गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहे. मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या हिंदी चित्रपटात तर काकस्पर्श, टाइमपास, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, भेट यांसारख्या मराठी चित्रपटात तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने नाटकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नवा गडी नवे राज्य हे तिचे नाटक तर चांगलेच गाजले होते. त्याचसोबत तिने बंदिनी, दामिनी यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. Also Read : ​​प्रिया बापट आणि स्वप्निल जोशीचा जुना फोटो तुम्ही पाहिलात का?