Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अखेर उलगडली यांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 17:04 IST

बघतोस काय मुजरा कर या चित्रपटातील तीन प्रमुख पात्रांची नावे आता समोर आली आहेत. पहिले पात्र आहे अक्षय टाकसाळे ...

बघतोस काय मुजरा कर या चित्रपटातील तीन प्रमुख पात्रांची नावे आता समोर आली आहेत. पहिले पात्र आहे अक्षय टाकसाळे याचे अक्षयने यामध्ये शिवराज वहाडणे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. दुसरे पात्र आहे अनिकेत विश्वासरावचे, पांडुरंग शिंदे ही भूमिका अनिकेतने केली आहे. तर तिसरे पात्र आहे जितेंद्र जोशीचे, नानासाहेब देशमुखची तडफदार भूमिका जितूने यामध्ये साकारली आहे. सोश्ल साईट्सवर या तिघांच्याही पात्रांची नावे उलगडण्यात आली अहेत. चेहºयाला लाल गुलाल लावलेला आणि काहीतरी करायच्या भावनेने पेटून उठलेले या तिघांचेही चेहरे पोस्टरवर पाहायला मिळतात. महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडदयावर उलगडत असतानाच आजच्या पिढीने पेटून उठावा असा संदेश देखील या सिनेमात असणार आहे. या सिनेमाचे बरेचसे चित्रीकरण गड-किल्यांवर देखील करण्यात आल्याचे समजतेय. त्यामुळे महाराजांचे वैभव पुन्हा एकदा आपल्याला या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडदयावर अनुभवता येणार आहे. बघतोय काय मुजरा कर या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. या सिनेमात शिवाजी महाराजांना एका वेगळ्याच पद्धतीने मुजरा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर गड किल्यांच्या संवर्धनासाठीदेखील यातील कलाकार पुढाकार घेताना दिसत आहेत. हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा असल्याने यासाठी हेमंत फारच उत्सुक आहे. हेमंत ढोमेच्या बघतोस काय मुजरा कर या आगामी सिनेमामध्येही काहीसा हाच आशय घेण्यात आला आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंतनेच केलं असून या सिनेमात जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव यांची मुख्य भूमिका आहे.