Join us
Daily Top 2Weekly Top 5

रईसमध्ये दिसणार उदय टिकेकर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 16:17 IST

  शाहरुख खानच्या रईस या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेले अभिनेते उदय ...

 
 शाहरुख खानच्या रईस या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेले अभिनेते उदय टिकेकर देखील पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. उदय टिकेकर यांची रईसमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे कळतेय. उदय टिकेकर यांनी हिंदी मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये नेहमीच दर्जेदार भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. बाबाजी ही त्यांची एका मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. ऊन पाऊस, अग्निहोत्र अशी अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले. हिंदीतही अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका लोकांच्या आजही लक्षात राहिलेल्या आहेत. आता रईसमध्ये देखील ते आपल्याला खलनायकाच्याच भूमिकेत दिसणार का हे लवकरच समजेल.