Join us

‘लिव्ह इन’वर भाष्य करणारा ‘TTMM’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 22:28 IST

आजच्या तरुणाईच्या स्वातंत्र्याची परिभाषा वेगळीच आहे.  स्वातंत्र्य म्हणजे मनाला पटेल ते सर्वकाही करणे. यातच काहीवेळा मागचा पुढचा विचार न ...

आजच्या तरुणाईच्या स्वातंत्र्याची परिभाषा वेगळीच आहे.  स्वातंत्र्य म्हणजे मनाला पटेल ते सर्वकाही करणे. यातच काहीवेळा मागचा पुढचा विचार न करता काही निर्णय घेतले जातात. आणि सुरू होते ती आयुष्याची ओढा-ताण.सध्या ‘लिव्ह - इन- रिलेशनशिप’मध्ये राहून एन्जॉय करण्याची क्रेझ युवा पिढीत दिसत आहे. लग्न बंधनात अडकून न पडण्यासाठी हा सोप्पा मार्ग अवलंबताना काहीजण दिसतात. मात्र ‘लिव्ह इन’ ही पाश्चिमात्त्य संकल्पना आहे, आपल्या भारतीय संस्कृतीत या सर्व गोष्टींना स्थान नाही, अशी आरोळीही एकीकडे ठोकताना काहीजण दिसतात. यात काय योग्य-अयोग्य याचे अनेक वादविवाद होत असतात. याच पार्श्वभूमिवर ‘बायोस्कोप’, ‘भारतीय’, ‘गुरूपौर्णिमा’, ‘बे दुणे साडेचार’, ‘ही पोरगी कोणाची’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले गिरीश मोहिते एक नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत.‘TTMM’ या चित्रपटाद्वारे हा नात्याच्या हळूवार बंधनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. याविषयी ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सांगितले, ‘TTMM’मध्ये कॉर्पोरेट जगतात वावरणार्या जोडप्याची कथा दाखविण्यात येणार आहे. पैसा, प्रसिद्धी, उच्च राहणीमान या साºया ऐहिक सुखांमध्ये प्रेमसुद्धा हरवले आहे. लग्नाच्या बंधनात न अडकता ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय हे जोडपे घेते. एकत्र असूनही वेगवेगळे आयुष्य जगणाºया या दोघांच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे सर्व या चित्रपटात पहायला मिळणार आहे.’सध्याच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात शॉर्टफॉमर्सचा उपयोग सर्रास करण्यात येतो. हाच ‘तुझं तू, माझं मी’ अशा  अ‍ॅटिट्यूडचाच तर विचार दिग्दर्शकांनी केला नसेल ना?