'रंगा पतंगा' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 09:13 IST
प्रसाद नामजोशी दिग्दर्शित रंगा पतंगा या चित्रपटात जीवनाचे विविध पैलू दर्शवण्यात आले आहेत.
'रंगा पतंगा' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
'रंगा पतंगा' या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपला ठसा उमटविला आहे. हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता तमाम प्रेक्षक वर्गाला आहे. प्रसाद नामजोशी दिग्दर्शित 'रंगा पतंगा' या चित्रपटात जीवनाचे विविध पैलू दर्शवण्यात आले आहेत.एका शेतक-याची बैल जोडी हरवते, त्याच्या शोधात असतानाच हा मुद्दा कसं राजकीय वळण घेतो, हे या चित्रपटात नाट्यमयरीत्या अनुभवता येईल. त्यामुळे शेतक-यांचं हलाखीचं जीवन या चित्रपटात पाहायला मिळेल.या चित्रपटाची निर्मिती अमोल गोले यांनी केली असून, या रंगा पतंगा चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात संदीप पाठक, नंदिता धुरी, सुहास पळशीकर, गौरी कोंगे, अभय महाजन, हार्दिक जोशी, आनंद कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. रंगा पतंगा हा चित्रपट १ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.