Join us

पुष्कराज का पळतो सोशल मीडियापासून दूर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 17:09 IST

सध्या सामान्य व्यक्तीपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाचा सोशल मीडिया हे माध्यम अधिक जवळचे वाटू लागले आहे. सोशल मीडियापासून कोणी ही ...

सध्या सामान्य व्यक्तीपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाचा सोशल मीडिया हे माध्यम अधिक जवळचे वाटू लागले आहे. सोशल मीडियापासून कोणी ही दूर राहूच शकत नाही अशी सध्याची परिस्थीती आहे. त्यात कलाकारांना सोशल मीडिया हे माध्यम अधिक जवळचे आणि गरजेचे वाटत असते. कारण  प्रेक्षकांपर्यत पोहोचण्याचा हा सर्वात सोपा आणि सोईस्कर मार्ग असतो. फेसबुक. ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियावर कलाकार हे आवर्जुन अपडेट राहतात. मात्र प्रेक्षकांचा लाडका कलाकार आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर हा मात्र सोशल मीडियापासून लांब असल्याचे दिसत आहे. हा अभिनेता फार कमी प्रमाणात सोशल मीडियावर अपडेट करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आशुच्या चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.  चाहत्यांची ही नाराजी पाहता लोकमत सीएनएक्सने पुष्कराज चिरपुटकरशी संवाद साधला असता तो म्हणाला, ''खरं सागू का, मी मुळातच सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात असतो. सोशल मीडियावर सतत अपडेट असणे हा माझा स्वभाव नाही. मी फक्त गरजेपुरताच सोशल मीडियाचा वापर करतो.'' त्याचप्रमाणे सोशल मीडियावर काहीतरी सतत अपडेट करण्याच्या पट्टीचा मी अजून झालेला नाही. आज जरी मी सोशल मीडियापासून लांब असलो तरी भविष्यात मी त्याच्या जवळदेखील असू शकतो. चाहत्यांचे म्हणाल, तर मला चाहत्यांविषयी अधिक प्रेम आहे. मी काय करतो याची उत्सुकता चाहत्यांना लागली असेल तर या गोष्टीचा मला अधिक आनंद आहे. तसेच चाहत्यांसाठी काहीतरी भन्नाट आणि हटके शेअर करायला मला देखील नक्कीच आवडेल. पुष्कराजने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. तसेच तो बुधिया सिंग बॉर्न टू रन या बॉलिवूड चित्रपटातदेखील पाहायला मिळाला होता.