पुष्कराज चिरपुटकर आणि सौरभ गोगटे एकत्रित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 17:57 IST
आपल्या अभिनयाने आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. प्रेक्षकांचा हा लाडका कलाकार लवकरच एका आगामी चित्रपटात ...
पुष्कराज चिरपुटकर आणि सौरभ गोगटे एकत्रित?
आपल्या अभिनयाने आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. प्रेक्षकांचा हा लाडका कलाकार लवकरच एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेता सौरभ गोगटेदेखील झळकणार आहे. या दोघांचा एकत्रित असा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अदयापदेखील कळाले नाही. तसेच या चित्रपटात त्यांच्या काय भूमिका असणार आहेत हे मात्र गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री दिप्ती देवीदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुष्कराज हा दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. या मालिकेतील त्याच्या आशु या भूमिकेला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्याचबरोबर ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, स्वानंदी टिकेकर झळकले होते. या सर्व कलाकारांची मस्ती तरूणांना खूपच भावली होती. म्हणूनच या मालिकेची पसंती पाहता लवकरच या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दिल दोस्ती दोबारा असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेतील पुष्कराज भूमिका ही कशापध्दतीची असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. त्याचबरोबर हा अभिनेता काही महिन्यांपूर्वीच बॉलिवुड चित्रपटातदेखील पाहायला मिळाला होता. हा त्याचा पहिलाच बॉलिवुड चित्रपट होता. बॉर्न टू बुधिया सिंग असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटातील त्याच्या छोटया भूमिकेनेदेखील प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. आता प्रेक्षकांचा हा लाडका कलाकार लवकरच रूपेरी पडदयावर पाहायला मिळणार असल्याने त्याचे चाहतेदेखील आनंदित असणार हे नक्की.