Join us

सोनाली कुलकर्णीसाठी आजचा दिवस दोन गोष्टींमुळे आहे स्पेशल, शुभेच्छांचा होतोय वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 19:08 IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. २४ मे म्हणजेच आजचा दिवस तिच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण आज तिच्या नवऱ्याचा ५०वा वाढदिवस आणि आजच्याच दिवशी लग्नाचा ११ वा वाढदिवस आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. 

सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने नवऱ्याचा फोटो शेअर करत लिहिले की, आज नचिकेतचा ५०वा वाढदिवस आहे आणि आमच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस आहे. तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्यासोबत कायम असू दे. प्रेम असू दे.

फार कमी लोकांना माहित असेल की सोनाली कुलकर्णीचे हे दुसरे लग्न आहे. २४ मे, २०१० मध्ये तिने नचिकेत पंतवैद्यबरोबर दुसऱ्यांदा लग्न केले. नचिकेत एशियानेट न्यूज मीडिया अँड एण्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एम.डी. पदावर कार्यरत आहेत. नचिकेत यांचे देखील हे दुसरे लग्न आहे. सोनाली आणि नचिकेत यांना कावेरी नावाची एक मुलगी आहे.

सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने गिरीश कर्नाड दिग्दर्शित 'चेलुवी' या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली. सोनालीने फक्त मराठी आणि हिंदी सिनेमातच काम केले नाहीत तर गुजराती, कन्नड, तामिळ, इटालियन आणि इंग्रजी सिनेमांत काम केले आहे.

मराठीत कैरी, घराबाहेर, देवराई, दोघी, मुक्ता, सखी, अगं बाई अरेच्चा -२ हे तिचे चित्रपट गाजले. तर दिल चाहता है, डरना जरुरी है, दिल विल प्यार व्यार, प्यार तुने क्या किया, सिंघम या हिंदी चित्रपटातही सोनालीने छाप उमटविली आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी