टिस्काला करायचयं मराठी दिग्दर्शकांबरोबर काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 12:51 IST
तारे जमीं पर’ सारखा चित्रपट असेल किंवा ‘२४’ सारखी मालिका टिस्का चोप्रा हे नाव चोखंदळ भूमिकांसाठीच ...
टिस्काला करायचयं मराठी दिग्दर्शकांबरोबर काम
तारे जमीं पर’ सारखा चित्रपट असेल किंवा ‘२४’ सारखी मालिका टिस्का चोप्रा हे नाव चोखंदळ भूमिकांसाठीच ओळखलं जातं. टिस्काने गेल्या वर्षी उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हायवे’ या मराठी चित्रपटात काम केलं होतं. मराठीतील चित्रपट इतके आशयघन असतात की चैतन्य ताम्हाणे, नागराज मंजुळेंसारख्या मराठमोळ्या दिग्दर्शकांबरोबर चांगले चित्रपट करण्याची आपली इच्छा असल्याचे टिस्काने सांगितले. टिस्काने सनी देओल दिग्दर्शित आणि अभिनित ‘घायल- वन्स अगेन’ या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट २६ जुलैला ‘झी सिनेमा’ वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने बोलताना सनी देओलचा पहिला ‘घायल’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आपण शाळेत होतो, अशी आठवण तिने सांगितली. तेव्हा हा चित्रपट खूप आवडला होता. एक म्हणजे अॅक्शनपट आणि दुसरे म्हणजे राजकुमार संतोषी हे माझे आवडते दिग्दर्शक आहेत. त्यामुळे अर्थातच इतक्या वर्षांनी जेव्हा या चित्रपटाच्या सिक्वलविषयी विचारणा झाली तेव्हा खूप आनंद झाला. म्हणजे एक तर लहानपणी आपल्याला आवडलेल्या चित्रपटांचे पुढचे भाग होतील आणि कधी तरी त्यात आपल्याला काम करायला मिळेल, अशी कल्पनाही कधी केली नव्हती. पण ते जेव्हा साध्य झालं तेव्हा ती संधी सोडणं शक्य नव्हतं, असं टिस्काने स्पष्ट केलं.