Join us

अनुदान मिळून ही १५ वर्षात चित्रपट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 13:56 IST

भारताच्या स्वातंत्र्यलढयातील थोर सेनानी लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्रपटाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने अडीच कोटी रुपये तर, राज्य सरकारने ५० लाख ...

भारताच्या स्वातंत्र्यलढयातील थोर सेनानी लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्रपटाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने अडीच कोटी रुपये तर, राज्य सरकारने ५० लाख रुपये देऊनही संबंधित निर्मात्याने १५ वर्षांत हा चित्रपट केलेला तयाक केला नाही. यासंदर्भात पुणेकरांच्या सहयांचे निवेदन दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवून या विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती सजग नागिरक मंचाने केली होती. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र माहिती आणि प्रसारण खात्याकडे पाठविण्याखेरीज काहीही केले नसल्यामुळे आजही या चित्रपटाची स्थिती काय हे समजत नाही. १ आॅगस्ट रोजी लोकमान्यांची पुण्यतिथी साजरी होत आहे. जनतेच्या कररूपी पैशांतून लोकमान्यांवरील चित्रपटाच्या निर्मितीसीठी दिलेल्या तीन कोटी रुपयांचे काय झाले, १५ वर्षांत हा चित्रपट का झाला नाही आणि लोकांना हा चित्रपट कधी पाहायला मिळणार या प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीत, याकडे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि वि. रा. कमळापूरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत लक्ष वेधले.