Join us  

'ठाकरे' सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 2:38 PM

बाळासाहेबांच्या भूमिकेतील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाला समीक्षकांसह प्रेक्षक पसंती मिळत आहे. बाळासाहेबांचे विविध पैलू दाखवण्यात दिग्दर्शक अभिजीत पानसे यशस्वी ठरले आहेत.

ठळक मुद्दे हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. संपूर्ण महाराष्ट्रात या सिनेमाची जबरदस्त चर्चा असून वीकएन्डनिमित्त मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग असे संपूर्ण राज्यातून प्रेक्षक हा सिनेमा बघण्यासाठी चित्रपटगृहाकडे गर्दी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाच्या मराठी शोजसाठी चित्रपटगृह जवळ जवळ भरली जात आहेत. शिवसैनिक असो वा नसो बाळासाहेब व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आकर्षण असलेला प्रत्येक माणूस हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेतील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाला समीक्षकांसह प्रेक्षक पसंती मिळत आहे. 

बाळासाहेबांचे विविध पैलू दाखवण्यात दिग्दर्शक अभिजीत पानसे यशस्वी ठरले आहेत. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्यातील पती-पत्नीचं प्रेमळ नातंही तितक्याच खूबीने रुपेरी पडद्यावर साकारण्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव यशस्वी ठरले आहेत. संपूर्ण चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेले बाळासाहेब प्रचंड प्रभावी वाटतात.  हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

टॅग्स :ठाकरे सिनेमानवाझुद्दीन सिद्दीकी