Join us

 तुला सनी लिओनी वगैरे व्हायचं आहे का? तेजस्विनी पंडित फोटोमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 13:22 IST

Tejaswini Pandit : ‘ले डुबी जा रहीं है गहराइयां हमें,’ असं कॅप्शन देत तेजस्विनीने एक फोटो शेअर केला. अनेकांना हा फोटो आवडला. पण काहींनी मात्र तिचा हा फोटो पाहून नाक मुरडलं.

तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit ) म्हणजे मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री. एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे, विविध नाटक आणि 100 डेजसारख्या मालिका शिवाय समांतर सारखी वेबसीरिजमधून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिकंणारी तेजस्विनी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.  सोशल मीडियावर तेजस्विनी प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. रोज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या तिने शेअर केलेल्या अशाच एका फोटोची जबरदस्त चर्चा रंगलीये. या फोटोंमुळे तेजस्विनी ट्रोल होतेय.होय, तेजस्विनीने तिचा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ‘ले डुबी जा रहीं है गहराइयां हमें,’ असं कॅप्शन देत तेजस्विनीने हा फोटो शेअर केला. अनेकांना हा फोटो आवडला. पण काहींनी मात्र तिचा हा फोटो पाहून नाक मुरडलं.

‘तुला सनी लिओनी वगैरे व्हायचे आहे का? तुझ्यात चांगली प्रतिभा आहे. हे काही करायची गरज नाही,’ अशी कमेंट करत एका युजरने तेजस्विनीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मराठी संस्कृती जपा, असा सल्ला अन्य एका युजरने तिला दिला.

एका युजरने तर ‘गरिबांची सनी’ असं म्हणत तिला ट्रोल केलं. ‘तेजस्विनी पंडित तुम्हाला शेभत नाही हे. तुम्ही गुलाबाची कळी आहात,’अशी कमेंट एका ट्रोलरने केली.

तेजस्विनीचा जन्म 23 मे 1986 रोजी पुण्यात तिचा जन्म झाला. तेजस्विनीने अल्पावधीतच सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमे, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयानं तिनं रसिकांची मनं जिंकली. आज घडली तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर तिने आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

टॅग्स :तेजस्विनी पंडितसोशल मीडिया