Join us

"तर मी तेव्हा लग्न करणार" तेजस्विनी पंडितने स्पष्टच सांगितलं; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:39 IST

तेजस्विनी पंडितने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला.

तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) महाराष्ट्रातील जनतेची लाडकी अभिनेत्री आहे. तेजस्विनीच्या सौंदर्यावर, तिच्या एकूणच व्यक्तिमत्वावर चाहते फिदा असतात. तिच्या सोशल मीडियावर कमेंट करत तर अनेकजण थेट तिला लग्नाची मागणी घालतात. मात्र तेजस्विनी पंडितलग्न का करत नाही, तिचे लग्नाबद्दलचे विचार काय यावर ती नुकतंच दिलखुलासपणे बोलली आहे.

तेजस्विनी पंडितने नुकतेच आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली. लग्नाबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, "आतापर्यंत असा जोडीदार भेटलाला नाहीये, ज्याच्यासोबत मला सेटल व्हायला आवडेल.  कारण, खूपवेळा कॅपॅबिलिटीचा विषय असतो. म्हणून मी म्हटलंय की लग्न केल्यावर स्त्रीला पुर्णत्व मिळतं असं नाही. आता ईतकी वर्ष झाली मी माझे पैसे कमावते आहे. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेते. माझ्या आईला कधीही काही कमी पडू दिलं नाही. जेव्हा बाबा होते, तेव्हा त्यांनाही काही कमी पडू दिलं नाही". पुढे ती म्हणाली, "मी आजही काही संस्थाना मदत करु शकते, तेवढं देवाने मला दिलं आहे. तर मग मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी मी करते आहे, तर हे तेव्हा होईल, जेव्हा एखादी व्यक्ती मला आवडेल, जी माझ्या आर्थिक किंवा भावनिक गरजा पुर्ण करण्यात सहभागी होईल, तेव्हा मी कदाचित लग्न करेल. पण, आता तरी मी माझा लग्नाचा विचार नाही. मी एकटी आणि आनंदी आहे", असं तिनं म्हटलं.  

तेजस्विनीने १६ डिसेंबर २०१२ रोजी तिचा बालमित्र भूषण बोपचेसोबत लग्न केलं. पण त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर तेजस्विनी आता वयाच्या ३९ व्या वर्षी सिंगल आयुष्य जगतेय. तेजस्विनी पंडितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तिचा 'येरे येरे पैसा ३' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनीसह कलाकारांच्या यादीत सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, उमेश कामत, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर ती व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.  

टॅग्स :तेजस्विनी पंडितलग्न