तेजस्विनीला आवडतात नोझ रिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 19:01 IST
नेहमीच वेगळ््या भुमिकांसाठी ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित तिच्या लुक्स मध्ये पण सतत ...
तेजस्विनीला आवडतात नोझ रिंग
नेहमीच वेगळ््या भुमिकांसाठी ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित तिच्या लुक्स मध्ये पण सतत बदल करीत असते. मी सिंधुताई सपकाळ बोलतेय या चित्रपटातील तेजस्वीनी आणि तु हि रे मधील ग्लॅमरस तेजस्वीनी या दोन्ही व्यक्तिरेखा तिने पडद्यावर सशक्तपणे साकारल्या होत्या. कोणताही लुक सहजपण कॅरी करणारी तेजस्वीनी सध्या हटके अंदाजात पहायला मिळत आहे. वेगळा हेअरकट आणि नाकात नोझरिंग घातलेली तेजस्वीनी फारच सुंदर दिसत आहे. तेजस्वीनी नोझ रिंगसाठी वेडी असून तीचे हे नोझरिंग प्रेम तिने सीएनएक्स सोबत शेअर केले आहे. तेजस्वीनी सांगते, मला लहानपणा पासूनच नाक टोचायला फार अवडायचे पण माझ्या आईने कधीच मला नाक टोचु दिले नाही. मग मी वेगवेगळ््या प्रकारच्या प्रेस रिंग वापरु लागले. मला नाकात नथ घालायलाही फार आवडते. नोझरिंगसाठी तर मी वेडी आहे. कोणत्याही ड्रेसवर आपण नोझरिंग घालू शकतो. मला नाक टोचुन घेता आले नाही म्हणुन मी प्रेस रिंग वापरून माझी ही हौस पुर्ण करून घेते.