Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्वीनी झाली बेस्ट अ‍ॅक्ट्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 17:50 IST

 प्रियांका लोंढे               आपल्या कामाचे जर कोणी कौतुक केले तर खरच त्यापेक्षा वेगळा ...

 प्रियांका लोंढे               आपल्या कामाचे जर कोणी कौतुक केले तर खरच त्यापेक्षा वेगळा आनंद काहीच नसतो. प्रत्येक कलाकारच यशस्वी होण्यासाठी अपार मेहनत घेऊन काम करीत असतो अन पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळते. प्रेक्षकांचे प्रेम तर असतेच परंतू जेव्हा एखाद्या चित्रपटासाठी उत्तम काम केले म्हणुन जर कोणता अ‍ॅवॉर्ड मिळाला तर त्या कलाकाराला आकाश ठेंगणेच होते. आता पहा ना आपल्या गुलाबाच्या कळीला म्हणजेच स्टनिंग तेजस्वीनी पंडितलाही ७  रोशन व्हिला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्क ार मिळाला आहे. या पुरस्कारा संदर्भातील भावना सीएनएक्सकडे व्यक्त करताना तिने सांगितले की, एवढ्या साºया लोकांमधुन मला हा पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे . जेव्हा तुम्हाला कोणताही पुरस्कार मिळतो तेव्हा तुमच्यावर अजुन चांगले काम करण्याची रिस्पॉनसिबीलीटी वाढते. मागच्या चित्रपटांमध्ये ज्या गोष्टी करण्याच्या राहुन गदेल्या ते इम्प्रुव्हमेंट तुम्हाला तुमच्या नेक्ट फिल्मसाठी करता येते. पुरस्कारांमुळे पुढे काहीतरी वेगळे काम करण्याची प्रेरणा मिळते. हे खरेच आहे. तेजस्वीनी एक व्हर्सटाईल अ‍ॅक्ट्रेस असुन तिने अनेक वेगवेगळ््या प्रकारच्या भुमिका साकारुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे यापुढे देखील ती असेच काम करेल अन अनेक पुरस्कार पटाकावेल यात काही शंकाच नाही.