Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तेरा यार हूँ मैं…" म्हणत तेजश्री प्रधानने शेअर केला खास व्यक्तीसोबतचा फोटो, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:04 IST

'त्या' खास व्यक्तीला तेजश्रीनं म्हटलं आपली 'सपोर्ट सिस्टिम'

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मराठी मालिकांसोबतच चित्रपटातही पदार्पण केलं आहे. तिने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. तिची फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे. तेजश्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील खास क्षण आणि जवळच्या व्यक्तींशी असलेले नाते ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच तिने एका खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केलाय. त्या व्यक्तीला तेजश्रीनं आपली 'सपोर्ट सिस्टिम' म्हटलं आहे.

तेजश्री प्रधानची ही खास व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही तर अभिनेत्री शिवानी बावकर ही आहे. तेजश्रीने शिवानीच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तेजश्रीने म्हटलं , "फोटो लवकर शेअर करू शकले नाही, कारण नेहमीप्रमाणे आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी तयार करण्यात मी व्यग्र होते".

पुढे तिनं लिहलं, "थोडक्यात सांगायचं तर "तेरा यार हूँ मैं" संपला विषय. बाकी वाढदिवस तर आनंदात साजरा झाला, आता हे नवीन वर्षही तसेच असू दे, माझी प्रिय सपोर्ट सिस्टिम".  तेजश्री प्रधान आणि शिवानी बावकर या खास मैत्रिणी आहेत. तेजश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये या दोन्ही अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहेत. शिवानीने पांढऱ्या रंगाचा तर तेजश्रीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत 'स्वानंदी'ची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तिच्यासोबत सुबोध भावे मुख्य भूमिकेत असून आहे. तर शिवानी बावकरनं 'लागिर झालं जी' मालिकेत शितलचं पात्रं साकारत रसिकांच्या मनात घर केले होतं. शिवानी सध्या स्टार प्रवाहच्या 'साधी माणसं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tejashri Pradhan shares photo with special friend, calls her support system.

Web Summary : Tejashri Pradhan shared a photo with actress Shivani Baokar on her birthday, calling her a 'support system'. Both actresses look stunning in the picture. Tejashri is currently acting in 'Veen Doghantali Hi Tutena', and Shivani is in 'Sadhi Mansa'.
टॅग्स :तेजश्री प्रधान शिवानी बावकर