Join us

झी टॅाकीजच्या यशाचं टॅाकीज नाईट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 17:31 IST

प्रादेशिक वाहिन्यांच्या जाळ्यात वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करत महाराष्ट्राच्या महावाहिनीने अर्थात झी टॅाकीज वाहिनीने गेले नऊ वर्षे आपलं वेगळेपण टिकवून ...

प्रादेशिक वाहिन्यांच्या जाळ्यात वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करत महाराष्ट्राच्या महावाहिनीने अर्थात झी टॅाकीज वाहिनीने गेले नऊ वर्षे आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं आहे. अनेक नावाजलेल्या चित्रपटांनी व चित्रपटविषयक कार्यक्रमांनी ही वाहिनी आता चांगलीच रसिकमान्य झाली आहे. सुपरहिट चित्रपटांचे प्रीमिअर आणि दर्जेदार कार्यक्रमांमुळे इतर वाहिन्यांच्या तुलनेत झी टॅाकीज सातत्याने वरचढ ठरली आहे. गेल्या नऊ वर्षात झी टॅाकीजने विक्रमांचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. आजही सर्वाधिक पाहिली जाणारी वाहिनी म्हणून झी टॅाकीजने आपलं प्रथम स्थान टिकवून ठेवलं आहे. या वाहिनीने नऊ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करीत दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. या यशस्वी प्रवासाचे औचित्य साधत झी टॅाकीजच्या वतीने टॅाकीज नाईट्स हा अनोखा कार्यक्रम मंगळवार २९ नोव्हेंबरला सादर केला जाणार आहे. कलाकारांचे झी टॅाकीजशी नेहमीच जिव्हाळ्याचे ऋणानुबंध राहिले आहेत, भविष्यातही रसिकप्रेक्षकांशी व कलाकारांशी असलेले नाते दृढ करण्यासाठी झी टॅाकीजने टॅाकीज नाईट्स या अनोख्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. आजवर अनेक दर्जेदार कार्यक्रम आणि मराठी भाषा, संस्कृतीचे प्रतिबिंब उमटतील असे उपक्रम प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. आगामी काळात टॅाकीज नाईट्स अंतर्गत महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये कलाकारांसोबत जाऊन धमाल मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यशाच्या या टप्प्यावर कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने झी टॅाकीजने आपलं हे यश प्रेक्षकांसोबत साजरे करण्याचे ठरवले आहे. वाहिनीची लोकप्रियता लक्षात घेऊन कलाकार व प्रेक्षक यांचा एकत्रित मेळ साधण्याचा प्रयत्न झी टॅाकीज  यानिमित्ताने करणार आहे. निखळ मनोरंजनाचा ध्यास घेत, ‘आपलं टॅाकीज झी टॅाकीज’ टॅाकीज नाईट्स या कार्यक्रमाद्वारे, मनोरंजनाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे.