Join us
Daily Top 2Weekly Top 5

फितूरच्या गाण्यांना स्वानंद किरकिरे यांचे लिरिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 08:06 IST

मराठी कलाकार पडद्यावर जेवढे गाजतात तेवढेच पडद्यामागेदेखील गाजत आहे. जसे की, फितूर या बिग बजेट चित्रपटातील गाण्यांचे लिरिक्स मराठमोळे ...

मराठी कलाकार पडद्यावर जेवढे गाजतात तेवढेच पडद्यामागेदेखील गाजत आहे. जसे की, फितूर या बिग बजेट चित्रपटातील गाण्यांचे लिरिक्स मराठमोळे कलाकार स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहे. आश्चर्य वाटले असेल ना, हो पण अभिमान वाटावी अशीच ही गोष्ट आहे. कतरिना कैफ व आदित्य कपूर रॉय या तगड्या बॉलिवूड कलाकारांची फितूर या चित्रपटातील गाणी सध्या खूप गाजत आहेत. ये फितूर मेरा लाया मुझको है तेरे करीब या गाण्याची तर तरुणाईमध्ये प्रचंड चर्चा आहे. या गाण्यांचे शब्द स्वानंद किरकिरे यांचे आहेत. तसेच पाशिमा, हमिनस्तु, रंगा रे, तेरे लिए या सर्व गाण्यांचे गीतकारदेखील स्वानंद किरकिरे आहेत. यापूर्वी त्यांनी थ्री इडियट्स, परिणीती अशा चित्रपटातील गाणीदेखील लिहिली आहेत. तसेच बालगंधर्व, देऊळ या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील गाणीदेखील त्यांनी स्वत: लिहिली आहेत.