Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्निलचे नवे प्रेमगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 17:47 IST

          राधा ही बावरी या गाण्यांमुळे घराघरात पोहोचलेला गायक स्वप्निल बांदोडकर आता त्याच आणखीन एक ...

 
         राधा ही बावरी या गाण्यांमुळे घराघरात पोहोचलेला गायक स्वप्निल बांदोडकर आता त्याच आणखीन एक नवे गाणे प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. एका प्रेमगीत घेऊन स्वप्निल रसिकांच्या भेटीला येत आहे. तुझ्या प्रेमात मन हे माझे आज गुंतले असे या गाण्याचे बोल आहेत. त्याचा आगामी चित्रपट वलयसाठी त्याने हे गाणे गायले आहे. या चित्रपटाचा मुहुर्तच याच गाण्याने करण्यात आला आहे. या गाण्याचे गीतलेखन आणि संगीत प्रकाश प्रभाकर यांनी केले आहे. तर हे प्रेमगीत नक्कीच प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल असेच आहे. वलय या चित्रपटाचे दिग्दर्शक निकी बत्रा हे आहेत. तर या चित्रपटात अजिंक्य देव, रेशम टिपणीस, सुरेखा कुडची, अभिलाषा पाटील, आरती सपकाळ असे अनेक कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर अशोक कुंदनानी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. स्वप्निलने गायलेले हे प्रेमगीत नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आतापर्यंत गायलीले सगळी गाणी सुपरहिट ठरली आहेत. गालावर खळी, हा चंद्रसाठी, सावर रे मना, मला वेड लागले प्रेमाचे या स्वप्निलच्या गाण्यांना रसिकांनी पसंती दिली. स्वप्निलच्या चाहत्यांमध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.