स्वप्नील जोशी हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता. अगदी बालपणापासूनच स्वप्नीलने अभिनयात काम करण्यास सुरुवात केली. मराठीतला चॉकलेट बॉय असलेल्या स्वप्नीलने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही मालिका आणि नाटकांमध्येही तो दिसला. सध्या तो 'लग्न पंचमी' या नाटकाचे प्रयोग करत आहे. या नाटकाच्या प्रयोगादरम्यानच सहकलाकाराने स्वप्नीलचा व्हिडीओ गुपचूप रेकॉर्ड केला. ज्यामध्ये तो गाणं गाताना दिसत आहे. स्वप्नीलने त्याच्या सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये स्वप्नील मेकअप रुममध्ये बसल्याचं दिसत आहे. "फूलों के रंग से..." हे हिंदी गाणं स्वप्नील गात असल्याचं दिसत आहे. प्रेम पुजारी या सिनेमातील हे गाणं गाण्यात स्वप्नील इतका मग्न आहे की कोणीतरी आपला व्हिडीओ रेकॉर्ड करतंय, हेदेखील त्याच्या लक्षात येत नसल्याचं दिसत आहे. स्वप्नील जोशीच्या या व्हिडीओवर चाहते आणि सेलिब्रिटींनीही कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्वप्नीलचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, लग्न पंचमी या नाटकात स्वप्नील जोशीसोबत अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत आहे. अमृताने या नाटकातून रंगमंचावर पदार्पण केलं आहे. निपुण धर्माधिकारीने या नाटकाचं दिग्दर्शन केलं असून अमृता, स्वप्नीलसह सुनील अभ्यंकर आणि मधुगंधा कुलकर्णी या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. एक अभिनेता असण्यासोबतच स्वप्नील हा निर्माता देखील आहे.
Web Summary : Actor Swapnil Joshi's video singing 'Phoolon Ke Rang Se' during his play 'Lagna Panchami' went viral. Celebrities and fans praised his singing talent. He stars with Amruta Khanvilkar in the play, directed by Nipun Dharmadhikari.
Web Summary : अभिनेता स्वप्निल जोशी का नाटक 'लग्न पंचमी' के दौरान 'फूलों के रंग से' गाना गाते हुए वीडियो वायरल हुआ। हस्तियों और प्रशंसकों ने उनकी गायन प्रतिभा की सराहना की। वह निपुण धर्माधिकारी द्वारा निर्देशित नाटक में अमृता खानविलकर के साथ हैं।