Join us  

स्वानंद तेंडुलकरने पत्नी गौतमी देशपांडेसाठी कोणता खास पदार्थ केला? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 3:47 PM

​​ स्वानंद व गौतमी दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत.

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे स्वानंद तेंडुलकर व अभिनेत्री गौतमी देशपांडे. काही दिवसांपूर्वीच दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वानंद व गौतमी दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. निरनिराळे फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. आता लग्नानंतर पहिल्यांदाच स्वानंदने लाडकी बायको गौतमीसाठी खास पदार्थ बनवला आहे. गौतमीने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गौतमीने इन्स्टाग्राम एक स्टोरी शेअर करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं. गौतमीने स्वानंदने बनवलेल्या पदार्थांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  'शेफ मिस्टर स्वानंद तेंडुलकर' असं कॅप्शन तिनं दिलं. स्वानंदने गौतमीसाठी खास चीज गार्लिक ब्रेड आणि त्यासोबत पास्ता बनवला. याअगोदरही अनेकदा स्वानंदने गौतमीसाठी पदार्थ बनवले आहेत. स्वानंदला उत्तम स्वयंपाक करता येतो, असं त्यानं सांगितलं आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. लग्न झाल्यापासून स्वानंद व गौतमी अनेकदा पोस्टच्या माध्यमातून एकमेकांवरील प्रेम जाहीर करत आहेत.

गौतमीने स्वानंद तेंडुलकरबरोबर २५ डिसेंबर लग्नगाठ बांधली. या लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. गौतमी आणि स्वानंद यांचं लव्ह मॅरेज आहे. विशेष म्हणजे गौतमीने स्वानंदला नकार दिला होता. परंतु, त्याच्यासोबत मैत्री झाल्यानंतर ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली. त्यांच्या या प्रेमाचा प्रवास तिने लग्नातील एका व्हिडीओमध्ये सांगितला होता. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत गौतमीनं सई ही भूमिका साकारली. सारे तुझ्याचसाठी, माझा होशील ना या मालिकांमध्ये देखील गौतमीनं काम केलं. गौतमी सध्या 'गालिब' या नाटकात काम करताना दिसत आहे. तर स्वानंद तेंडुलकर मराठीतील पहिलं डिजीटल चॅनल 'भाडिपा'चा बिझनेस हेड आहे. तसेच  भाडिपाच्या विविध व्हिडीओ आणि सीरिजमध्येही तो अभिनयही करताना दिसला आहे. सोशल मीडियावर त्याचाही मोठा चाहतावर्ग आहे. 

टॅग्स :गौतमी देशपांडेसेलिब्रिटीटिव्ही कलाकारमराठी अभिनेतासोशल मीडिया