सुशांत आहे नाटकाच्या शोधात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 13:53 IST
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाटकांची धूम चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक नवीन नाटक रंगभूमीवर येत आहे. एवढेच नाही ...
सुशांत आहे नाटकाच्या शोधात
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाटकांची धूम चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक नवीन नाटक रंगभूमीवर येत आहे. एवढेच नाही तर या नवीन नाटकांमध्ये छोटा पडदा व रूपेरी पडदयावरील कलाकार हे मोठया प्रमाणावर पाहायला मिळत आहे. या नाटकांच्या प्रेमामध्ये आता अभिनेता सुशांत शेलारदेखील पडला आहे. कारण तो सध्या नवीन नाटकाच्या शोधात असल्याचे त्याने लोकमत सीएनएक्सला सांगितले. सुशांत सांगतो, मराठी इंडस्ट्रीतील सर्वच कलाकार नाटकाकडे वळाले आहेत म्हणून मी नाटकाचा शोध घेत आहे असे बिलकुलच नाही. नाटकांची मुळात हौस असली पाहिजे. रंगभूमीवर एक काम करण्याची आत्मीयता असली पाहिजे. मी माझे पहिले नाटक १९९२ साली केले होते. नथुराम गोडसे, वस्त्रहरण असे अनेक नाटक केले आहेत. गेली चार वर्ष झाले मी नाटक केले नाही. त्यामुळे सध्या मी नाटकांच्या शोधात आहेत. यासाठी खूपजणांशी बोलणीदेखील केली आहे. मात्र मनाला समाधान वाटणारे एक ही नाटक मिळाले नाही. चांगली स्क्रीप्ट मिळाली की नक्कीच मी प्रेक्षकांना पुन्हा रंगभूमीवर पाहायला मिळेल. तसेच सध्या नाटकांमध्ये खूप सारे कलाकार त्याचबरोबर नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. पण नाटकाचे वीस ते पंचवीस प्रयोग करून ते नाटक सोडून देण्यात काही अर्थ नसतो. रंगभूमीवर नाटक करण्याची ती क्षमता प्रत्येकामध्ये असली पाहिजे. कारण नाटक चार वाजता सुरू होणार असेल तर कलाकाराला साडे तीन पर्यत नाटयगृहामध्ये पोहोचावेच लागते. नाटक करण्यासाठी तो एक आत्मविश्वास, प्रयत्न, मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. सुशांतने यापूर्वी अनेक चित्रपट केले आहेत. यामध्ये दुनियादारी, क्लासमेट, मॅटर तू ही रे, संघर्ष अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याच्या या गोजिरवाण्या घरात, किमयागार, घे भरारी, काटा रूते कोणाला अशा अनेक मालिकादेखील केल्या आहेत. सुशांतची दुनियादारी या चित्रपटातील प्रितमची भूमिका ही प्रेक्षकांना फारच भावली होती. आज ही प्रेक्षक त्याची ती भूमिका विसरले नाही आहेत.