सैराटनं घडवली जादू… पाहा आधी कशी दिसायची तुमची लाडकी आर्ची
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 14:51 IST
मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे सैराट. झिंग झिंग झिंगाटच्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच ...
सैराटनं घडवली जादू… पाहा आधी कशी दिसायची तुमची लाडकी आर्ची
मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे सैराट. झिंग झिंग झिंगाटच्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले. लग्न समारंभ, पार्टीमध्ये, हळदीला किंवा इतर समारंभात ‘डिजे वाले बाबू’ अशा गाण्यांची मागणी करणारे आता ‘झिंगाट’ गाण्याची फर्माईश करताना दिसतात. आजही अनेकांच्या प्ले-लिस्टमध्ये ‘झिंगाट’,‘सैराट झालं जी’ ही गाणी हमखास पाहायला मिळतात. सैराट सिनेमाची कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, आकर्षक असं चित्रीकरण, नागराज मंजुळेचे अफलातून दिग्दर्शन अशा अनेक गोष्टींमुळे रिलीजच्या २ वर्षांनंतरही सैराटची जादू तसूभरही कमी झालेली नाही. सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरु तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला.त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. सैराटमुळे तरुणाई जणू काही आर्ची नावाचा जप करु लागली. या सिनेमाने आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचं संपूर्ण आयुष्यच पालटलं. सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा आता फुलऑन मेकओव्हर झाला आहे. सैराट रिलीज होण्याआधीची रिंकू आणि आत्ताची रिंकू यांत बराच फरक पाहायला मिळेल. गावरान अंदाजातील रिंकूचा जणू काही कायापालट झाल्याचे तुम्हाला तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन सहज कळेल. एका गावातल्या मुलीने आर्ची साकारत तरुणाईवर जादू केली आहे. त्यामुळे तिची एक झलक पाहण्यासाठी तरुण-तरुणी उत्सुक असतात.त्यामुळेच की काय तिच्याभोवती खास बॉडीगार्ड्सचं सुरक्षाकवच असतं.सैराटनंतर रिंकू 'मनसुमल्लिगे' या कन्नड सिनेमात झळकली.सध्या ती कागर सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. एखादा फोटो अपलोड व्हावा आणि त्या फोटोची चर्चा काही वेळेतच रंगावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडिया.असाच एक फोटो सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो आहे अभिनेत्री मनवा नाईक, आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू या कलाकारांचा. प्रेक्षकांच्या या तीन लाडक्या कलाकारांच्या फोटो सध्या सोशलमीडियवर खूपच चर्चा होत असल्याचे दिसत आहे. कारण हा फोटो पाहून प्रेक्षकांना ही आश्चर्य वाटेल यात शंका नाही. कारण या फोटोमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांना वाटा फुटल्या आहेत. हे तिघे भविष्यात एकत्रित दिसणार का असा प्रश्न उपस्थित राहिला असेल तर ही शंका आताच दूर करा. कारण हा फोटो एका पुरस्कार सोहळयादरम्यानचा आहे. या दोघांना पाहून अभिनेत्री मनवा नाईक हिलादेखील फोटो काढण्याचा आवरला नाही. तिने नुकतेच सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू यांच्यासोबतचा हा फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे.