Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनील बर्वेच्या लेकीनं केला वडिलांसाठी इमोशनल परफॉर्मन्स, कलाकारांच्या डोळ्यात आले अश्रू, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 06:00 IST

सुनील बर्वेने इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांची अपडेट देत असतात. या माध्यमातून ते त्यांचे आनंदी आणि दुःखी क्षणदेखील शेअर करत असतात.  अभिनेता सुनील बर्वे सोशल मीडियावर फार सक्रीय नाहीत. मात्र नुकताच त्यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत त्याच्या लेकीने त्याच्यासाठी स्पेशल परफॉर्मन्स केला होता. जो पाहून तिथे उपस्थित असलेले सर्व कलाकार इमोशनल झाले होते.

सुनीव बर्वेने इंस्टाग्रामवर लेकीसोबतचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, तिच्या जन्मापासून मला या क्षणाची भीती वाटत होती. सुनील बर्वेची लेक सानिका हिच्या लग्नात परफॉर्म करतानाचा हा व्हिडिओ आहे. ज्यात सानिका राजी सिनेमातील दिलबरो या गाण्यावर वडिलांसोबत थिरकताना दिसते आहे. त्यांचा परफॉर्मन्स पाहताना तिथे उपस्थित असलेल्या कलाकार देखील भावूक झालेले पहायला मिळाले. 

या लग्नसोहळ्यात अनेक मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार देखील हजर होते. त्यांना देखील हा परफॉर्मन्स पाहून गहिवरुन आले. सुनिल बर्वे यांनी लेक सानिका बर्वेसोबतचा हा व्हिडिओ पोस्ट करत मुलीच्या लग्नातील आठवणींना उजाळा दिला आहे. प्रत्येक वडिलांसाठी आपल्या मुलीला दुसऱ्या घरी पाठवताना एक बाप म्हणून काय वाटते, ते या व्हिडिओत स्पष्ट दिसून येते आहे.

सुनिल बर्वे सध्या 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. या मालिकेला आणि ते साकारत असलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

टॅग्स :सुनील बर्वेपुष्कर श्रोत्री